पोलीस सूत्रांनुसार, शहादा येथील म्युनिसिपल हायस्कूलजवळ ही घटना घडली. हितेश विजय भोई असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर मोन्या गिरासे, रा. रामनगर, शहादा, सुऱ्या ठाकरे, सुधाकर माळी, पुरश्या पवार रा. सालदारनगर, शहादा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचे नावे आहेत. मोन्या गिरासे व इतरांनी हितेश यास शाळेजवळ अडवून तू दुचाकीचा कट का मारला? गावाचा डॅान झाला आहेस का? अशी विचारणा केली. त्यातून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. चौघांनी हितेश यास हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी सळईने वार करून ब्लेड मारल्याने त्याच्या पाठीवर जखमा झाल्या आहेत. याबाबत हितेश भोईच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाटील करीत आहे.
गावाचा डाॅन आहे का? विचारणा करीत चौघांची एकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST