शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:28 IST

शहादा : महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पावसाळी दिवसांमध्ये पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आह़े सध्या घाटमाथ्यावर तुरळक स्वरुपाचा पाऊस व ढगाळ हवामान असल्याने येथील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांना चांगलेच आकर्षित करीत आह़े राज्यातील विविध ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात़ विशेषत हिवाळा व पावसाळ्यात पर्यटक येण्याची संख्या ...

शहादा : महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पावसाळी दिवसांमध्ये पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आह़े सध्या घाटमाथ्यावर तुरळक स्वरुपाचा पाऊस व ढगाळ हवामान असल्याने येथील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांना चांगलेच आकर्षित करीत आह़े राज्यातील विविध ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात़ विशेषत हिवाळा व पावसाळ्यात पर्यटक येण्याची संख्या ही अधिक असत़े आठवडय़ाच्या शेवटी म्हणजे विकेंडला पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसून येत़े शुक्रवारी या ठिकाणी मोठय़ा संख्येने पर्यटकांची रेलचेल दिसून आली़ जुलै ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस असल्याने येथील निसर्ग अधिक खुलून दिसत असतो़ येथील डोंगरद:यांनी जणू काही अंगावर हिरवा शालू परिधान केला असल्याची मनमोहक चित्र दिसत असत़े त्यामुळे केवळ खान्देशातीलच नव्हेत तर, राज्य व देशभरातूनही पर्यटक या ठिकाणी येत निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत असतात़ राहण्यासाठी व्यवस्था असल्याने पर्यटक आपल्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी मुक्काम ठोकत असतात़ तोरणमाळ येथील सात पायरी घाटापासूनच निसर्गाचे सुंदर असे दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत अअसत़े सिताखाई, सनसेट पॉईंट, खडकी पॉईंट, मच्छींद्रनाथ गुफा, यशवंत तलाव आदी ठिकाणी  पर्यटकांची मोठी गर्दी होत असत़े सिताखाई पॉईंट वरील मनमोहक दृश्य व यशवंत तलावातील बोटींगमुळे बालकांसह जेष्ठ नागरिकही या ठिकाणी रमत असल्याचे दिसून येत़े दरम्यान, येथील गोरक्षनाथ मंदिरातसुध्दा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आह़े या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागत आहेत़ यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना मंदिराच्या आवारात नारळसह पुजासाहित्य विक्रीतून ब:यापैकी रोजगार उपलब्ध होत आह़े या शिवाय अनेक व्यावसायिकांकडून या ठिकाणी जेवन तसेच नाश्ताची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आह़े त्यामुळे यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आह़े उंचावरील भाग असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाणही सर्वाधिक असत़े सध्या ढगाळ हवामान तसेच तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो़ हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात पर्यटकांचा या ठिकाणी येण्याचा ओघ  अधिक  असतो़ त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही प्रशासनाला कार्यवाही करावी लागत असत़े नंदुरबारातील प्रमुख आकर्षण असल्याने आता           देशी पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकांचीही गर्दी याठिकाणी होऊ लागली          आह़े