शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन बोटांना शाई यंदा कुणालाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:43 IST

ईटीपीबीएस पद्धतीचा परिणाम : फ्रॉक्सी मतदानाचे प्राधिकार पत्र यंदा कुणीही भरले नाही

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :दोन बोटांना शाई यंदा कुणालाही लावली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात सर्व्हीस व्होटर मधून फ्रॉक्सी मतदानासाठी यंदा कुणीही निवडणूक विभागाकडे अर्ज केला नाही. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमनुसार (ईटीपीबीएस) सर्व्हीस व्होटरला यंदा मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सुटसुटीत पद्धतीचा लाभ जिल्ह्यातील सर्वच अर्थात ९८५ मतदारांना घेतला.सैनिकी मतदार अर्थात सर्व्हीस व्होटर यांना पूर्वी पोस्टाने बॅलेट पेपर पाठविला जात असे. तो मिळाल्यानंतर त्यावर मत देवून ते परत पाठविले जात होते. ही फारच किचकट प्रक्रिया होती. त्यामुळे अनेक सर्व्हीस व्होटर आपल्या नातेवाईकांना फ्रॉक्सी मतदानाचा अधिकार देत होते. त्यामुळे अशा प्राधिकार दिलेल्या मतदाराला त्याचे स्वत:चे आणि प्राधिकार दिलेल्या मतदाराचे मतदान करावे लागत होते. परिणामी त्याच्या दोन बोटांना शाई लावली जात होती.आता ईटीपीबीएस पद्धतनोकरीनिमित्त अथवा निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गावी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी टपाली मतदान पद्धतीने मतदान मागविले जाते.यंदा सैन्यातील अधिकारी, कर्मचारी (सर्व्हीस व्होटर) यांच्यासाठी नवीन प्रणाली कार्यान्वित केली असून, नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार मतदार संघातील या मतदारांना आॅनलाईन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.दोन बोटांना अशी लागते शाई...दुसºया व्यक्तीला मतदानाचा दिलेला अधिकाराला प्रॉक्सी मतदान असे म्हटले जाते. त्यानुसार पत्नी, भाऊ, मुलगा, वडिल, आई यापैकी एकाला हा अधिकार दिला जातो. ते अधिकार पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अशा प्रॉक्सी व्होटरची वेगळी नोंद करतात. संबधीत जर त्याच ठिकाणी मतदार असेल तर त्याचे नाव वेगळ्या यादीत राहते. तशा सुचना संबधीत मतदान केंद्र संचालकांना कळविल्या जातात. मतदान करण्यासाठी आलेला संबधीत मतदार आपले स्वत:चे मत टाकतांना त्याच्या तर्जनीला शाई लावली जाते तसेच अधिकार दिलेल्या व्यक्तीचे मतदान करतांना त्याच्या मधल्या बोटाला शाई लावली जाते. त्यामुळे एकाच मतदानाच्या वेळी त्याच्या दोन बोटांना शाई लावली जाते.