शहरं
Join us  
Trending Stories
1
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
2
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
3
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
4
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
5
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
6
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
7
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
8
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
9
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
10
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
11
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
12
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं
13
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
14
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
15
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
16
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
17
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
18
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?

जिल्ह्यात असेही आहेत तलाठी ज्यांच्या कधी होईनात भेटीगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महसूल दप्तरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण पद म्हणून तलाठीकडे पाहिले जाते़ ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महसूल दप्तरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण पद म्हणून तलाठीकडे पाहिले जाते़ ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आणि महसूल प्रशासन यांच्या महत्त्वपूर्ण दुवा म्हणून तलाठी पदाची निर्मिती केली गेली असावी़ परंतू जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तलाठी कार्यालये दिवसभर तर काही ठिकाणी दुपारनंतर बंद केली जात असल्याचे प्रकार सुरू आहेत़‘अप्पा’ कधी येणार म्हणून वाट पाहणारे बाहेर बसून राहूनही त्यांची तलाठी गाठ पडत नसल्याचे दिसून आले़ ‘लोकमत’ने बुधवार आणि गुरूवार अशा दोन दिवसात जिल्ह्यातील विविध भागात तलाठी कार्यालयांची स्थिती पडताळून पाहिली होती़ यात काही ठिकाणी दिवसा आणि काही ठिकाणी दुपारून तलाठीच आले नसल्याचे समोर आले़ धडगाव तालुक्यात दुपारी चारनंतर एकही तलाठी भेटत नसल्याने नागरिकांकडून सांगण्यात आले़नंदुरबारनंदुरबार तालुक्यात एकूण ४४ सजा आहेत़ यासाठी ३६ तलाठी कार्यारत असून आठ पदे रिक्त आहेत़ शहरातील मेघनगर भागात तलाठी भवन निर्माण करण्यात आले आहे़ याठिकाणी तलाठींची व्यवस्था केली गेली आहे़ परंतु बºयाचवेळा दुपारून या कार्यालयाला टाळे असते़ जुन्या तहसील कार्यालयातही बºयाचवेळा तलाठी भेटत नसल्याचे दिसून आले आहे़अक्कलकुवाअक्कलकुवा तालुक्यात काही तलाठी मुख्यालयी राहत असून अधिकाधिक तलाठी हे बाहेर गावाहून येत असल्याचे दिसून येते़ अक्कलकुवा शहरातील तलाठी भवन तलाठींच्या उपस्थितीअभावी बºयाचवेळा बंद असले़ शहरात राहणारे काहीजण घरून कार्यालय चालवत आहेत़ अक्कलकुवा तालुक्यात तलाठींच्या ३४ सजा आहेत़ तेथे २६ तलाठी कार्यरत असून ८ पदे रिक्त आहेत़ तहसील कार्यालय शेजारी तालुक्यातील तलाठ्यांसाठी तलाठी भवन बांधण्यात आले आहे़ याठिकाणी तलाठी आपल्या सजेतील नागरिकांना सेवा देत असत मात्र अलीकडे तलाठी भवन बंद असल्याचे दिसून येत आहे़ बाहेरगावाहून येणाºया तलाठींची वाट बघत अनेक जण थांबून राहत राहत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे़तळोदातळोदा शहरात तलाठी कार्यालय सुरू असल्याचे तसेच नागरिकांची गर्दी दिसून आली़ ग्रामीण भागात तलाठी कार्यालये बंद असल्याने मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली़ काही ठिकाणी कार्यालये नसल्याने तलाठी ग्रामपंचायतीत बसत असल्याचे समोर आले़ दरम्यान तळोदा शहरात कार्यालय सुरू असल्याने कामे होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले़शहादाशहादा शहर व परिसरात मलोणी, लोणखेडा, पाडळदा, उंटावद, धुरखेडा, कुकडेल, पुरूषोत्तमनगर आदी गावांमध्ये तलाठी सजा आहेत़ याठिकाणी तलाठींची नियुक्ती करण्यात आली आहे़ या ठिकाणी दरदिवशी कामकाज होत असले तरी त्यात विलंब होत असल्याची माहिती देण्यात आली़ दुपारनंतर तलाठी भेटत नसल्याचे सांगण्यात आले़ शहादा शहरात मंडळाधिकारी कार्यालयातच तलाठी कार्यालय आहे़ याठिकाणी दिवसभर नागरिकांची वर्दळ राहते़जिल्ह्यात एकूण ९५२ गावे आहेत़ या गावांच्या सुविधांसाठी २२२ सजा निर्माण करण्यात आल्या आहेत़ या प्रत्येक सजेला एक तलाठी सध्या नियुक्त आहेत़ एकूण ३६ मंडळात नियुक्त असलेल्या तलाठींकडे कामाचा बोजा अधिक असल्याचे सांगण्यात आले़ एका तलाठीकडे साधारण १५ पेक्षा अधिक गावे असल्याने बºयाचवेळा कामात अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली़