मोबाइल लंपास
नंदुरबार : शहरातील मन्यार चौक परिसरातून चोरट्यांनी मोबाइल लंपास केला. शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्यार चौकात वसीम शेख रहिम (रा.घोडापीर मोहल्ला) यांनी त्यांच्या खिशात मोबाइल ठेवला होता. चोरट्यांनी तो लंपास केला. त्यांनी ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आला नाही. याबाबत त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रकाश अहिरे करीत आहे.
शहाद्यात चारजणांवर कारवाई
शहादा : विनामास्क फिरल्याप्रकरणी शहाद्यात चार जणांवर कारवाई करण्यात आली. शहाद्यातील बसस्थानक व पालिका चौकात ही कारवाई करण्यात आली. कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक असताना तसे न करता चारजण विनामास्क फिरताना आढळले. त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. शहादा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.