शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात ‘थॅलेसिमिया’चे 37 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण आणि सिकलसेल यामुळे बेजार असलेल्या जिल्ह्यात थॅलेसिमिया या दुर्धर आजाराचे 37 रूग्ण आहेत़ दिवसेंदिवस रूग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत असतानाच थॅलेसिमियाग्रस्तांना शासकीय मदतीची गरज भासत असल्याचेही वास्तव समोर येत आह़े दीर्घ काळ उपचार आणि त्यातून निष्पन्न होणारे तुटपुंजे यश असा खेळ असलेल्या या आजारामुळे खासकरून ...

ठळक मुद्देतपासणी केंद्राची आवश्यकता या दुर्धर आजारातून बाहेर पडण्याचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकच उपाय आहे. यासाठी 14 लाख खर्च आहे. उपचाराठी प्रथम एचएलए मॅचिंग टेस्ट व बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था शासनाने राज्यातील सामान्य रूग्णालयांमध्ये करून दिल्यास अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण आणि सिकलसेल यामुळे बेजार असलेल्या जिल्ह्यात थॅलेसिमिया या दुर्धर आजाराचे 37 रूग्ण आहेत़ दिवसेंदिवस रूग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत असतानाच थॅलेसिमियाग्रस्तांना शासकीय मदतीची गरज भासत असल्याचेही वास्तव समोर येत आह़े दीर्घ काळ उपचार आणि त्यातून निष्पन्न होणारे तुटपुंजे यश असा खेळ असलेल्या या आजारामुळे खासकरून लहानग्यांचे बालपण हिरावले जात आह़े या आजारातून बचावण्यासाठी लागणारा अफाट खर्च कमी होऊन जिल्ह्यात सुविधा मिळाव्यात यासाठी तळोदा येथील सात वर्षीय थॅलेसिमियागग्रस्त चिमुरडी दीक्षा गणेश गुरव हीने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साद घालून आजाराने बेजार झालेल्या रूग्णांची मूळ समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आह़े गुरूवारी तळोदा दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना दीक्षासह तिच्या पालकांनी पत्रवजा निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता़ हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वीय सहायकांनी स्विकारले होत़े यात म्हटले आहे की, थॅलेसेमिया व सिकलसेल हे अनुवांशिक असे असाध्य आजार असून नंदुरबार जिल्ह्यात 37 थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत़  या रुग्णांचे हिमोग्लोबिन कमी कमी होते म्हणून त्यांना दर महिन्यास वयाप्रमाणे 1 किंवा 2 रक्ताच्या पिशव्या द्याव्या लागतात. त्यांची दर चार ते सहा महिन्यांनी शारीरिक तपासणी करावी लागते. या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक औषधे घ्यावी लागतात. हे सर्व करताना रुग्णाच्या आई-वडीलांची आर्थिक, शारीरिक व मानसिक ओढाताण होऊन असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रूग्णाला रक्त देण्यासाठी बालरोगतज्ञाकडे एका दिवसाकरीता दाखल करावे लागत असल्याने, त्यासाठी  दिवसाची 500 रूपयांर्पयत फी द्यावी लागते. जिल्ह्यातील बहुतांश पालक हे आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असल्याने त्यांना अनेकवेळी डॉक्टरांची ही फी देणे अशक्य होत़े यासाठी धुळे येथे थॅलिसिमिया डे केअर सेंटर  सुरू व्हावे,  महिन्यातून एकदा रक्त दिल्यानंतर रूग्णाच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी लागणा:या डेसीरॉक्स ही औषधी गरजेची असत़े नंदुरबार येथे उपलब्ध करण्यात याव्यात,  रुग्णांना रक्त देतांना अनेक अनावश्यक रक्त घटक शरीरात जाऊन होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी लागणारे ल्यूकोसिट फिल्टर शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावे, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत प्रवासाची सवलत द्यावी, या रुग्णांना धुळे येथील नवजीवन रक्तपेढी रक्ताचा पुरवठा करत़े रक्ताच्या नॅट चाचणीची मोफत उपलब्धता करून देण्याची आवश्यकता आह़े