शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी योजनेला फाटा देत कापड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 11:30 IST

विद्यार्थी गणवेश वाटप : तळोदा आदिवासी प्रकल्पातील प्रकार; चौकशीची मागणी

ठळक मुद्दे. दीड महिना होऊनही अद्याप गणवेश नाही 4आश्रमशाळेतील मुला-मुलींना शैषणिक वर्षात आदिवासी विकास विभागाकडून दोन गणवेश दिले जात असतात. पहिला गणवेश शाळा उघडल्यानंतर 15 ऑगस्ट पावेतो दिला जातो व दुसरा गणवेश त्याच महिन्याच्या अखेरीस देण्यात येतो. परंतु शैक्षणिक वर

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शासनाच्या शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्याथ्र्याना गणवेश अथवा इतर साहित्य देताना ते प्रत्यक्ष पुरविण्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यावर रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना हा निर्णय धाब्यावर बसवत तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांवर ठेकेदारांनी जून महिन्यातच गणवेशाचे कापड पुरविल्याचा प्रकार समोर आला        आहे.गणवेशाअभावी कापडांचे गाठोडे देखील तसेच धूळखात पडले आहे. शासनाच्या अशा धोरणाबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विद्याथ्र्याना तातडीने गणवेश देण्यात यावा, अशी पालकांची अपेक्षा आहे. शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी मुला-मुलींसाठी संपूर्ण राज्यात साधारण 552 निवासी शासकीय आश्रमशाळा 28 प्रकल्पांमार्फत गणवेश, रेणकोट, शैक्षणिक व इतर साहित्य पुरविले जाते. हे साहित्य ठेकेदारांमार्फत पुरविले जात होते. तथापि अतिशय निकृष्ठ दर्जाचे पुरविले जात असल्याने पालकांकडून शासनाकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारी येत होत्या. या पाश्र्वभूमिवर शासनाने ऑक्टोंबर 2016 मध्ये आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना कोणत्या वस्तुंचा लाभ, वस्तु स्वरूपात न देता त्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर देण्याचा निर्णय म्हणजे डी.बी.टी. योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे,  असे असताना आदिवासी विकास विभागाने ठेकेदारांमार्फत जून महिन्यातच तळोदा तालुक्यातील बहुतेक आश्रम शाळांवर गणवेशाचे कापड पुरविले असल्याचा प्रकार पुढे आला आहे. वास्तविक रोख रक्कम विद्याथ्र्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झालेला असताना आदिवासी विकास विभागाने त्यास हरसाळ फासला आहे. शाळांवर कापड पाठवून जवळपास दीड-दोन महिने झाले आहे. परंतु कापडाचे हे गाठोडे अक्षरश: धुळखात पडले        आहे. या प्रकरणी वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.दरम्यान, यासंदर्भात तळोदा प्रकल्पातील एका अधिका:याने नाव न सांगण्याच्या अटीवर गणवेश शिलाईची निविदा काढण्यात आल्याचे सांगितले.