दहावीच्या निकालाची टक्केवारी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढली असली तरी विभागात जिल्हा गेल्या वर्षाप्रमाणेच शेवटी असल्याची स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८८.१३ टक्के लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आज आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी जिल्हयात एकुण २० हजार ८५२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयाचा एकुण निकाल ८८.१३ टक्के लागला. जिल्हयातील ४ हजार ३४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ७ हजार ८२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५ हजार ४८० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ३८ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.नंदुरबार जिल्हयाचा एकुण निकाल ८८.१३ टक्के लागला. यात सर्वाधिक निकाल हा नवापूर तालुक्याचा तर सर्वात कमी निकाल धडगाव तालुक्याचा लागला आहे. नवापूर तालुक्याचा निकाल ९३.४३ टक्के लागला. धडगाव तालुक्याचा निकाल ७८.४० टक्के लागला. तळोदा तालुक्याचा निकाल ७८.६८ टक्के लागला. शहादा तालुक्याचा निकाल ९२.४० टक्के, नंदुरबार तालुक्याचा निकाल ८७.९२ टक्के तर अक्कलकुवा तालुक्याचा निकाल ८६.०७ टक्के लागला.गेल्या वर्षी ७४.४४ टक्के निकाल लागला होता. यंदा जवळपास १४ टक्यांनी निकाल वाढला असला तरी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये तो सर्वात कमी असल्याचे चित्र आहे.