शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीसाठी आताशी निविदा प्रक्रिया सुरू : आंतरराष्ट्रीय शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:42 IST

यंदाही तोरणमाळऐवजी नंदुरबारातच सुरू राहणार

नंदुरबार : तोरणमाळला मंजूर झालेली पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा इमारतीअभावी सलग दुस:या वर्षी नंदुरबारात भरत आहे. शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस होता. आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात ही शाळा सुरू आहे. दरम्यान, तत्कालीन शिक्षण संचालक नंदकुमार यांच्या संकल्पनेतून ही शाळा सुरू झाली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी तिला आकार दिला.तोरणमाळ केंद्रांतर्गत दुर्गम भागातील गाव-पाडय़ांमधील शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी व्हावे, सर्व विद्याथ्र्याना एकाच ठिकाणी शिक्षण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तोरणमाळ येथे निवासी शाळा सुरू करण्याचे नियोजन  करण्यात आले. तत्कालीन शिक्षण संचालक नंदकुमार यांनी पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय निवासी शाळा मंजूर करून घेतली. गेल्या शैक्षणिक वर्षापासून ही शाळा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी अनेक अडचणींना तोंड देत ही शाळा सुरू झाली. यंदा शाळेचे दुसरे वर्ष आहे. परंतु सर्वच कारभार हा उधार- उसनवारीवर सुरू असल्याचे चित्र यंदाही कायम आहे.धडगाव गटातील तोरणमाळ केंद्रात 852 शाळाबाह्य मुले सव्रेक्षणात आढळून आली होती. तोरणमाळ केंद्र हे अतिदुर्गम भागात आहे. तोरणमाळ ग्रुप ग्रामपंचायतीत एकूण 29 स्थानिक स्वराज्य    संस्थेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 1665 मुले शिक्षण घेत    होती. येथील वाडे-पाडे विखुरलेले असल्यामुळे शाळेपासून अशा वस्तींचे अंतर अधिक असल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आहे. शिवाय शाळा बांधकामासाठी साहित्य नेण्यास दळणवळणाचादेखील अभाव आहे. परिणामी सर्व विद्याथ्र्याना एकाच ठिकाणी निवासी शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील ही पहिली आंतरराष्ट्रीय शाळा सुरू झाली.उद्देश कायम राहावाआंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याचा तत्कालीन शिक्षण संचालकांचा उद्देश या भागातील विद्याथ्र्याना आंतरराष्ट्रीय दर्जाचे निवासी शिक्षण मिळावे हा होता. तो उद्देश कायम राहावा ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी अनेक त्रुटी होत्या. त्या दूर करून यंदा शाळा सुरळीत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नंदकुमार यांची बदली झाल्याने आता नवीन अधिकारी कितपत गांभीर्य ठेवतात यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.