शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षानंतर मार्गी लागला नंदुरबार रेल्वे स्थानकातील पादचारी पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वे स्थानकातील पादचारी पूल अखेर दहा वर्षानंतर पुर्ण झाला. यामुळे कोरीटनाका, पटेलवाडी, बादशहानगर भागातील लोकांसाठी बसस्थानक परिसरात येणे सोयीचे ठरणार आहे. असे असले तरी उड्डाणपुलाकडील बाजूस आणखी एक पादचारी पुलाच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष कायम आहे. नंदुरबारातील रेल्वे स्थानकात ब्रिटीशकालीन पादचारी पूल आहे. ...

ठळक मुद्देभिकारी व मद्यपींपासून सुटका व्हावी..
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वे स्थानकातील पादचारी पूल अखेर दहा वर्षानंतर पुर्ण झाला. यामुळे कोरीटनाका, पटेलवाडी, बादशहानगर भागातील लोकांसाठी बसस्थानक परिसरात येणे सोयीचे ठरणार आहे. असे असले तरी उड्डाणपुलाकडील बाजूस आणखी एक पादचारी पुलाच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष कायम आहे. नंदुरबारातील रेल्वे स्थानकात ब्रिटीशकालीन पादचारी पूल आहे. या पुलाची एक बाजु पहिल्या व दुसरी दुस:या फलाटावर आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस असलेल्या नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून यावे व जावे लागत होते. ही बाब लक्षात घेता आहे त्या उड्डाणपुलाचा विस्तार करून दोन्ही भाग हे रेल्वे स्थानकाच्या बाहेर काढण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. गेल्या दहा वर्षापासूनची ही मागणी अखेर आता पुर्णत्वास आली आहे. पादचारी पुलाच्या विस्तारीकरणाचे काम पुर्ण झाले असून लवकरच तो सर्वसामान्यांना वापरण्यासाठी खुला करण्यात येणार आहे.विद्याथ्र्याना सोयीचेरेल्वे स्थानकाच्या पलिकडील वसाहतीत अर्थात पटेलवाडी, बादशहानगर, कोरीटनाका, गायत्रीनगर, महावीरनगर या भागात राहणा:या विद्यार्थी, नागरिकांना शहरात येण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. उड्डाणपुलामुळे रेल्वेगेट देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडत विद्यार्थी व सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत होती. स्थानकात मालगाडी उभी असल्यास त्या खालून देखील ये-जा करावी लागत होती. त्यामुळे आहे त्या पादचारी पुलाचा विस्ताराची मागणी जोर धरू लागली होती.स्थानकाच्या बाहेरून पूलपादचारी पुलाचे विस्तारीकरण करण्यात आल्यानंतर आता या पुलाची एक बाजू रेल्वे स्थानकाच्या सध्या असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पूव्रेकडील बाजूने निघणार आहे. त्यामुळे स्थानकात प्रवेश करण्याची गरज राहणार नाही. दुसरी बाजू ही बादशहा नगरात निघणार आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडणे किंवा स्थानकात प्रवेश करण्याची गरज राहणार नाही हे स्पष्ट आहे.पश्चिमेकडील बाजूसही पूल हवारेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस अर्थात उड्डाणपुलाच्या बाजूला आणखी एक पादचारी पूल तयार करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. जुन्या कोरीटरोडवरील बर्फ कारखान्याजवळ एका बाजूस तर रेल्वे पोलीस ठाण्याच्या बाजूला दुसरे टोक मागणी असलेल्या नवीन पादचारी पुलाचे राहिल्यास लक्ष्मीनगर, जुन्या तहसील कार्यालयाचा परिसर, हाटदरवाजा परिसरातील नागरिकांसाठी तसेच महिला महाविद्यालय, एकलव्य, कमला नेहरू कन्या विद्यालयातील विद्याथ्र्याना ते सोयीचे ठरेल.