शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

नंदुरबारातील तापमान चाळीशी खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:36 IST

दिलासा : ताशी २२ किमी गतीने वाहताय वारे, धुळीची समस्या निर्माण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात सध्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे़ शनिवार व रविवारी साधारणत: ताशी १८ ते २२ किमी गतीने वारे वाहत होते़ पुढील एक ते दोन दिवस वाऱ्यांचा असाच प्रभाव कायम राहणार आहे़ एकीकडे वाऱ्यांचा प्रभाव वाढत असताना तापमान चाळीशीच्या खाली गेलेले दिसून आले़ शनिवारी ३९ तर रविवारी ३९.८ इतके कमाल तापमानाची नोंद झाली़नंदुरबारातील तापमानाात किंचित घट बघायला मिळत आहे़ आठवड्यापूर्वी तब्बल ४२ अंशाच्या घरात गेलेले कमाल तापमान दोन दिवसांपासून ३९ अंशावर स्थिर आहे़ त्यामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळताना दिसत आहे़ परंतु ही स्थिती फार काळ राहणार नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़उत्तरेकडील जम्मू-काश्मीर परिसरात दोन ठिकाणी वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे़ तो हळूहळू पुर्वेकडे सरकत आहे़ त्यामुळे भारताच्या पूर्व भागापासून ते दक्षिणेपर्यंत ट्रफ रेषा तयार झालेली आहे़ या ट्रफ रेषेत बराचसा विदर्भ व मराठवाड्याचाही भाग आलेला आहे़ त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे़ अशा वातावरणीय बदलामुळे राज्यभरात वाºयांच्या वेगात वाढ झालेली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़ नंदुरबारात ताशी १८ ते २२ किमी वेगाने वारे वाहत असल्याने तापमानात किंचित घट होऊन नागरिकांना उष्णतेपासून काहिसा दिलासा मिळत आहे़ एक ते दोन दिवस वाºयांचा वेग कायम राहून उत्तर तसेच मध्य महाराष्ट्रात तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे़ग्रामीण भागात धुळीची समस्याशहरी भागासह ग्रामीण भागात वेगवान वारे वाहत असल्याने शेतकºयांच्या आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे तळोद्यातील शेतकºयांकडून सांगण्यात आले़ त्याच प्रमाणे ग्रामीण भागात कच्चे रस्ते असल्याने अशा ठिकाणी धुळीची समस्या निर्माण झालेली होती़राजस्थानात उष्ण लहरीदरम्यान, सध्या राजस्थान, कच्छ, सौराष्ट आदी भागांमध्ये उष्ण वाºयांचा प्रभाव निर्माण झालेला आहे़ आठवड्यापूर्वी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात निर्माण झालेला हा प्रभाव काहिसा ओसरलेला दिसून येत आहे़ मराठवाडा, विदर्भ तसेच पूर्वीकडील ‘सेव्हन सिस्टर’ राज्यांमध्ये निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे राज्यातील काही भागात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे़दरम्यान काही दिवसातच पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत़ सध्या वातावरणात २५ ते ३० टक्के आद्रता राहत असल्याने उकाड्यात वाढ झालेली दिसून येत आहे़ त्यामुळे साहजिकच नागरिकांकडून पंखे, कुलर, एसी आदी साधनांचा वापर करण्यात येत आहे़