शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 44 ठिकाणी तापमानाची सुरळीत नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या रविवारी नाशिक विभागात सर्वाधिक उष्ण जिल्हा  म्हणून नंदुरबार जिल्ह्याचा सर्वत्र गवगवा झाला़ अचानकपणे दिल्या गेलेल्या वाढीव आकडेवारीचा शोध प्रशासन घेत आह़े मात्र तूर्तास नंदुबार जिल्ह्यात 44 ठिकाणी तापमान सुरळीतपणे नोंद घेतली जात आह़े       नंदुरबार जिल्ह्यात ऋतूमानानुसार बदलणा:या हवामानाची नोंद भारतीय हवामान खाते, कुलाबा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या रविवारी नाशिक विभागात सर्वाधिक उष्ण जिल्हा  म्हणून नंदुरबार जिल्ह्याचा सर्वत्र गवगवा झाला़ अचानकपणे दिल्या गेलेल्या वाढीव आकडेवारीचा शोध प्रशासन घेत आह़े मात्र तूर्तास नंदुबार जिल्ह्यात 44 ठिकाणी तापमान सुरळीतपणे नोंद घेतली जात आह़े       नंदुरबार जिल्ह्यात ऋतूमानानुसार बदलणा:या हवामानाची नोंद भारतीय हवामान खाते, कुलाबा वेधशाळा या दोन्ही शासकीय संस्थांकडून तसेच स्कायमेट या खाजगी संस्थेकडून घेतली जात़े  दैनंदिन तापमान, पजर्न्यमान, उष्णता, आद्र्रता, वा:याचा वेग यांच्या नोंदी घेण्यासाठी तिन्ही संस्थांमध्ये विशेष करार करण्यात आला आह़े या तिन्ही विभागांनी घेतलेल्या नोंदीची दर दोन तासांनी तपासणी करून ही आकडेवारी उपग्रहाद्वारे दिल्ली येथे पाठवण्यात येत़े गत रविवारी नंदुरबार येथील तापमान हे नाशिक विभागातील सर्वाधिक तापमान असल्याची बातमी एका इंग्रजी दैनिकाने दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती़ जिल्ह्यात 38 मंडळनिहाय हवामान यंत्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, शहादा, नवापूर आणि नंदुरबार तालुक्यात साखर कारखाने,  आणि जिल्हाधिकारी कार्यालय अशा 44 ठिकाणी रविवारी दिवसाचे तापमान  33 अंशापेक्षा अधिक नसतानाही दिल्या गेलेल्या  आकडेवारीमुळे एकच गहजब उडाला होता़ सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने सर्व तापमान यंत्रांचा आढावा घेण्याचे काम हाती घेतले आह़े सुरळीत चालणा:या सर्वच यंत्रांची दर दोन तासांनी नोंदणी होत आहे, किंवा नाही, याचा आढावा घेत, जिल्हा प्रशासनाने तसा अहवाल हवामान खात्याकडे पाठवल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार शहरात कृषी महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी तापमानाची नोंद घेणारी यंत्रे आहेत़ दोन्ही यंत्रे भारतीय हवामान खात्याच्या अखत्यारित आहेत़ स्वयंचलित या यंत्रांच्या नोंदी दर दोन तासांनी कुलाबा वेधशाळा आणि दिल्ली येथील मुख्यालयात उपग्रहाद्वारे पाठवल्या जातात़ याबाबत कृषी महाविद्यालयाचे डॉ़ अरूण कांबळे यांनी सांगितले की, हवामान खात्याने या यंत्रांचे नियंत्रण करण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले आहेत़ त्यांच्याकडून वेळोवेळी नोंदीचा आढावा घेतला जातो सध्या यंत्र सुस्थिती सुरू आह़े या यंत्रांमुळे कृषी क्षेत्र आणि नागरी क्षेत्राला धोक्याच्या सूचना ह्या तात्काळ देण्याची सोय आह़े जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्राच्या नोंदी कुलाबा वेधशाळेकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाठवल्या जातात़ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी या नोंदींचा दिवसभरात वेळोवेळी आढावा घेतात़ व्यतिरिक्त पुरूषोत्तम नगर, डोकारे आणि समशेरपूर येथील तिन्ही साखर कारखाने तसेच कृषी विज्ञान केंद्र येथील तापमान यंत्रेही सुस्थितीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े