शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

डामरखेडा पुलाजवळ शिक्षकाला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 22:08 IST

n    लाेकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :   येत्या आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने त्यापूर्वीची कोरोना चाचणी करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील ...

n    लाेकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :   येत्या आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने त्यापूर्वीची कोरोना चाचणी करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथून तळोदा येथे परतणा-या शिक्षकाचा डामरखेड्याजवळ अपघातात मृत्यू झाला. डामरखेडा पुलाजवळील खराब रस्त्यात दुचाकी अचानक घसरून शिक्षक खाली पडल्यानंतर मागून येणा-या ट्रकने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा गंभीर अपघात घडला. राजेंद्र मधुकर पाटील (४०) असे मयत शिक्षकाचे नाव असून ते तळोदा येथील श्रीराम नगरातील रहिवासी होते. राजेंद्र पाटील हे पाडामुंड ता. धडगाव येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दिवाळीनिमित्त ते चिमठावळ ता. शिंदखेडा येथील गावी गेले होते. गुरूवारी तेथून एमएच १८ बीएस ६९४८ या दुचाकीने परत येत असताना डामरखेडा ते प्रकाशा दरम्यान गोमाई नदीच्या पुलाजवळ त्यांची दुचाकी अचानक घसरल्याने राजेंद्र पाटील हे रस्त्यावर पडले. दरम्यान मागून एमएच २६ बीई १८६९ हा ट्रक आला. ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने शिक्षक राजेंद्र पाटील हे अक्षरश: चिरडले जावून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रकाशा येथे पाठवला होता. परंतू तेथे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने त्यांचा मृतदेह म्हसावद ता. शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. प्रकाशा आरोग्य केंद्रातील या समस्येमुळे नातलगांनी संतापही व्यक्त केला. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत होती. अपघातानंतर दीड तास प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान वाहतूक ठप्प होती. 

मयत शिक्षकाचे कुटूंब गेले होते गावी   दिवाळीनिमित्त मूूळगावी गेलेले राजेंद्र पाटील परत येत असताना हा अपघात घडला. यावेळी ते एकटेच होते. त्यांची पत्नी १२ वर्षीय मुलगी व सात वर्षीय मुलासह माहेरी गेल्या होत्या. येत्या दोन चार दिवसात त्याही परत येणार होत्या.   गावाहून परत येणा-या राजेंद्र पाटील यांच्या दुचाकीवर धान्याच्या गोण्या बांधल्या होत्या. यातून खराव रस्त्यावर त्यांचा तोल गेला असावा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तळोदा येथील त्यांचे मित्र व चिमठावळ येथील कुटूंबिय घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.