शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात यंदा २ लाख ७७ हजार हेक्टरचे उद्दीष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून बाजारात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून बाजारात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. साधारणत: २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी एवढ्यात पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, उन्हाळी हंगामात १९ हजार हेक्टरवरील पीकं लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने हातची गेल्याचे चित्र आहे.सर्वसाधारणपणे ७ जूनपासून पावसाळा सुरू होत असतो. गेल्या तीन दिवसांपासून झालेला पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस होता. जमिनीत बºयापैकी ओल करणारा पाऊस असला तरी पेरणीयोग्य नसल्याचा निर्वाळा आधीच कृषी विभागाने दिलेला आहे. खरीपाच्या पार्श्वभुमीवर बाजारात विविध पिकांचे बियाणे व खते उपलब्ध झाली आहेत. कृषी विभागाने मागणी केलेल्या आवंटनाप्रमाणे त्याची उपलब्धता झाली असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.सर्वाधिक कापूसचे क्षेत्रजिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण २ लाख ७७ हजार ८०५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापूस पिकाचे १ लाख ६ हजार इतके आहे. त्या खालोखाल सोयाबीनचे २७ हजार ८९ हेक्टर क्षेत्र आहे. भाताचे २० हजार ८९५, ज्वारीचे ३० हजार १२६, मकाचे ३१ हजार ९२८, उडीदाचे १२ हजार ६६८, ऊसचे १० हजार ८८१ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय बाजरी, तूर, मूग, भुईमूग, तीळ, सूर्यफूल यांचेही क्षेत्र बºयापैकी आहे.३८ हजार क्विंटल बियाणेखरीप हंगामासाठी साधारणत: ३८ हजार ६६८ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. सध्या बियाण्यांची मागणी मर्यादीत स्वरूपात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. बी.टी.कापसाचे साधारणत: अडीच हजार क्विटल बियाणे उपलब्ध आहेत. महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून विविध वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात महाबिजकडून १२ हजार ३८८ तर खाजगी कंपनींकडून २६ हजार २८० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.खताचे आवंटन मंजूरखतांची उपलब्धता देखील बºयापैकी आहे. युरियाची सर्वाधिक ७० हजार २६० मे.टन मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४७ हजार ३०० मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. सद्य स्थितीत ४९ हजार ३०३ मे.टन युरिया उपलब्ध आहे. अमोनियम सल्फेटचा ४१५ मे.टन साठा, एमओपीची ७,८४० मे.टन मागणी असून ९,८०० मे.टन आवंटन मंजूर झाले आहे. एकूण ११, ४०९ मे.टन उपलब्ध आहे. डीएपीचे ६, ११५ मे.टन खत उपलब्ध आहे. एसएसपीचे ११,५०० मे.टन मागणी आहे. त्यापैकी ३ हजार २३ मे.टन उपलब्ध असून एकुण २०, १७३ मे.टन साठा उपलब्ध आहे. संयुक्त खताची मागणी १६,७१० मे.टन होती त्यापैकी १९,४८० मे.टन मंजूर झाले. आधीचे ३,४४४ मे.टन एकूण २२,९२४ मे.टन साठा उपलब्ध आहे. मिश्रखताचे ५३६ मे.टन खतसाठा उपलब्ध आहे. एकुण खतांची १ लाख १८ हजार १६० मे.टन मागणी असून त्यापैकी ९८ हजार ९३० मे.टन आवंटन मंजूर आहे. एकुण १ लाख १० हजार ८७५ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.उन्हाळी हंगाम लॉकडाऊनमध्येजिल्ह्यात १९ हजार ३४० हेक्टरवर उन्हाळी पिके होती उन्हाळी बाजरी १ हजार ४२६ हेक्टर, उन्हाळी मका १ हजार ६१९, मूग १ हजार ४४४, भूईमूग १ हजार ४१, सूर्यफूल १८२, बार्टी ४१ या धान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांची एकूण ६ हजार ३५५ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती़ दुसरीकडे फळे आणि भाजीपाला पिकांची एकूण १२ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होतीे़ यात कांदा ७९०, वांगी ४७, मिरची ७५, भाजीपाला ४३२, टरबूज ८३४, केळी २७७, पपई ६७ तर ऊस ४ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आला़ एकूण १२ हजार ९८५ हेक्टरवर ही पिके होती विशेष बाब म्हणजे यंदाही उन्हाळी पिकातून ज्वारी, तीळ, सोयाबीन हे बाद झाले असल्याचे दिसून आले़ तर लागवड पिकांचे क्षेत्र हे कमीच आहे़