शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पाणीटंचाईने त्रस्त गावांना मिळाला तापीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाचा निर्धार आणि लोकप्रतिनिच्या सहकायार्मुळे नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाचा निर्धार आणि लोकप्रतिनिच्या सहकायार्मुळे नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व निंभेल गावाची पाणी समस्या दूर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तापी नदीवरून सुरू केलेल्या तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजनेमुळे गेल्या तीन वषार्पासून टंचाईचा सामना करणा:या या गावातील नागरिकांना आणि पशुधनाला उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे.नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व निंभेल या गावात गत तीन ते चार वर्षांपासून गावकरीभीषण पाणी टंचाईचा सामना करीत होते. दोन वर्षांपासून पर्जन्यमान अगदीच कमी झाल्याने भूजल पातळी अगदीच खोल गेली आहे. गावातील सर्वच विहिरी व विंधनविहिरीआटल्या असून परिसरातील सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत. या गावांना पाण्याचा आधार असलेले बलदाणे धरणही पूर्णत: आटले आहे. परिणामीपाणीटंचाईची भीषणता आणखीनच वाढली होती. या उन्हाळ्यात गावक:यांसमोरगावे सोडण्याचे संकट उभे ठाकले होते.या भागात दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांचे स्थलांतर आणि पशुधनाचे पालनही मोठी समस्या झाली होती. मात्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेत या गावांसाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. तापी नदीपासून 12 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकून या गावांना पाणी पुरवठा करण्यात आला.या गावांच्या जवळपास कोणतेच पाण्याचे स्त्रोत नसल्याने, दूरवर असलेल्या तापी नदीच्या पात्रातून पाणी उचल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनिधी व ग्रामपंचायत स्तरावरील तातडीच्यापाणीटंचाई निवारणासाठी असलेल्या सर्व निधी, स्थानिक विकास कार्यक्रम आणि सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणा?्या निधींचाएकत्रित वापर करूनयोजना राबविण्यात आली.प्रथम टप्प्यात तापीनदीच्या किनारी विंधनविहीर करून पाण्याची उचल करण्यात आली आणि सुमारे नऊ किलोमीटर जलवाहिन्या टाकून भादवड येथील मोठ्या विहिरीत पाणीसाठा करून या गावाची पाणी समस्या दूर करण्यात आली. त्याच विहिरीतून उद्भव घेऊन  न्याहली, बलदाणे, व कार्ली या गावांपयर्ंत साडेचार किलोमीटर जलवाहिन्या टाकून तेथील विहिरीपयर्ंत पाणी नेण्यात आले.जलवाहिन्यांच्या मार्गात रेल्वे रूळ येत असल्याने केंद्रीयरेल्वे प्रशासनानेही पाणीटंचाईचेगांभीर्य लक्षात घेता जलवाहिन्या टाकण्याची परवानगी तातडीने दिली. या चारही गावातील एकत्रित 9,800 लोकसंख्येसाठी यशस्वीपणे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.मौजे सातुर्के येथील 1,250 लोकसंख्येला व निंभेल व कंड्रे या गावातील एकत्रित 2,640 लोकसंख्येलाही अशाच प्रकारेपाणीपुरवठा करण्यात आला.शासनाच्या विविध निधींचामाध्यमातून तातडीने योजना राबविली गेल्यानेदुष्काळने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या घरापयर्ंत पिण्याचे पाणी पोहोचविण्यात शासनाला यश आले आहे. भर उन्हाळ्यातपिण्याचे पुरेशे पाणी व पशुधनाच्या संगोपनासाठी लागणारे पाणी उपलब्ध झाल्याने या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.