शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तापी काठावर चारा छावण्या करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:50 IST

दुष्काळी गावांमध्ये पहाणी : पालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश, शेतक:यांनी मांडल्या व्यथा

नंदुरबार : जिल्ह्यात चा:याची गंभीर टंचाई निर्माण झाल्यास प्रसंगी तापी काठावरील गावांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी तयारी ठेवावी. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मजुरांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे अशा सुचना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध गावांमध्ये दुष्काळी पहाणी दौ:याप्रसंगी दिल्या. शेतक:यांनी पिण्याचे पाणी, वाया गेलेले पीक, जनावरांसाठी चारा याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. दुष्काळी गावांच्या पहाणीसाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार व शहादा तालुक्यातील आठ गावांना भेटी दिल्या. गाव शिवारात जावून त्यांनी पिकांची पहाणी केली. शेतक:यांशी, ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतक:यांनीही त्यांना विविध समस्या मांडून मागण्या केल्या. पालकमंत्री रावल यांच्यासह आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात दुष्काळी गंभीर स्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना दुष्काळी गावांची पहाणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आपण पहाणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी पालकमंत्र्यांनी न्याहली गावाला भेट दिली. तेथील शेतक:यांशी संवाद साधला. गेल्या सहा ते सात वर्षापासून सतत दुष्काळाची स्थिती आहे. पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागते. गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी योजना तयार करावी अशी मागणी देखील यावेळी शेतकरी व गावक:यांनी केली. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची पहाणी           केली. तेथून बलदाणे येथे गेल्यावर शेतक:यांनी  पाऊसच नसल्यामुळे अमरावती नाला प्रकल्प देखील कोरडाच पडला आहे. त्याचा शेतक:यांना काहीएक उपयोग नाही. यासाठी तापी-बुराई प्रकल्पाला गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तेथून भादवड, सातुर्के या गावांना त्यांनी भेटी दिल्या. शहादा तालुक्यातील पुसनद, अनरद, सावळदे, कौठळ येथील शेतांमध्ये जावून त्यांनी पिकांची पहाणी केली. नंदुरबार तालुका, शहादा तालुका, नवापूरसह तळोदा तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आतापासूनच उपाययोजना करण्याच्या सुचना    त्यांनी दिल्या. खरीप पिकांची   अवस्था बिकट झालेली आहे.  त्यामुळे जनावरांना चारा देखील उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे आधीच पर राज्यात चारा              वाहतुकीला बंदी घातली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. जनावरांसाठी नंदुरबार व शहादा तालुक्यात तापी काठावर  चारा छावण्या उभारण्यासाठी नियोजन करावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ.अर्चना पठारे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, अनिकेत पाटील, जिल्हा अधीक्षक                कृषी अधिकारी बी.एन.पाटील, तहसीदार नितीन पाटील, मनोज खैरनार, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, नंदुरबार बाजार समितीचे उपसभापती हरिश्चंद्र पाटील, जि.प.सदस्य जयपाल रावल, अनिल भामरे आदींसह त्या त्या गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व इतर अधिकारी उपस्थित होते.