शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

दोन पाडय़ांना यंदाही लागणार टँकर

By admin | Updated: February 8, 2017 22:13 IST

सरासरी इतका पाऊस होऊनही टंचाई : 180 गावे व 400 पाडय़ांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट

नंदुरबार : गेल्या दहा वर्षापासून नियमित पाणी टंचाई जाणवणा:या धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा आणि गुगलमालपाडा या दोन्ही पाडय़ांना यंदाही टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. यामुळे मात्र, जिल्हा टँकरमुक्तची प्रशासनाची तयारी  वाया जाणार असल्याचे यंदाही स्पष्टच आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा तुलनेत 90 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तीन तालुक्यांमधील सरासरीही ओलांडण्यात आली आहे. परिणामी यंदा पाणी टंचाईची स्थिती फारशी राहणार नसल्याचे सांगण्यात येत   होते. परंतु शहादा तालुक्यातील 135 आणि नंदुरबार तालुक्यातील 15 अशी दीडशे गावांची पीक पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर केल्याने तो भाग दुष्काळी जाहीर करण्यात आला   आहे.याशिवाय भुजल पातळी आणि इतर सव्रेक्षणानुसार यंदाच्या उन्हाळ्यात टंचाई जाणवणा:या गावांचीही यादी तयार करण्यात आली आहे.दोन्ही पाडे कायमस्वरूपीजिल्ह्यात धडगाव तालुक्यातील दोन पाडे वगळता एकाही गावाला किंवा पाडय़ाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ गेल्या 15 वर्षात आलेली नाही. त्यामुळे टँकरमुक्त जिल्हा अशी बिरुदावली जिल्हा मिरवत असला तरी या दोन पाडय़ांमुळे त्याला खिळ बसत असल्याची स्थिती आहे. गेल्या तीन ते चार वर्षात राज्यातील अनेक भागात हजारो टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु नंदुबार जिल्ह्यात तशी वेळ आलेली नव्हती. यंदा तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी टंचाईची शक्यता मावळली होती.भौगोलिक स्थिती अडसरधडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलपाडा हा पाडा  बिजरी ग्रामपंचायतीअंतर्गत येतो तर गुगलमालपाडा हा वोरोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येतो. गौ:याचा बोदलापाडा आणि गुगलमाडा या पाडय़ांची भौगोलिक स्थिती तीव्र चढाव आणि तीव्र उताराची आहे.    त्यामुळे त्या ठिकाणी कूपनलिका करता येत नाही. काही वर्षापूर्वी पाडय़ालगत वाहणा:या नाल्यात कूपनलिका करण्यात आली, परंतु तिचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी टँकरशिवाय या दोन्ही पाडय़ांना पर्याय उरत नसल्याची स्थिती आहे.पहिल्या टप्प्यात निरंकपाणी टंचाईचे नऊ महिन्यातील तीन टप्पे करण्यात येतात. पहिला टप्पा हा ऑक्टोबर ते डिसेंबरचा असतो. दुसरा जानेवारी ते मार्च आणि तिसरा एप्रिल ते जून असा असतो. यंदा पहिल्या टप्प्यात एकाही गावाला पाणी टंचाई जाणवली नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.आता दुस:या टप्प्यात 109 गावे आणि 396 पाडय़ांवर पाणी टंचाई जाणवत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी टंचाई कृती आराखडादेखील तयार करण्यात आला आहे.तृतीय सत्रात 71 गावे आणि चार पाडय़ांवर पाणी टंचाई राहण्याची शक्यता आहे. दोन्ही टप्पे मिळून एकूण 180 गावे आणि 400 पाडय़ांना यंदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.साडेचार कोटींचा खर्चजिल्ह्यात यंदा पाणी टंचाई उपाययोजनांवर जवळपास चार लाख 47 हजार 62 हजार रुपये अंदाजीत खर्च होणार असल्याचे स्पष्ट    करण्यात आले आहे. 180 गावे आणि 400 पाडय़ांसाठी एकूण    पावणेसहाशे योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात विहीर खोल करणे, विहिरीतून गाळ काढणे दोन ठिकाणी, खाजगी विहीर व कूपनलिका यांचे अधिग्रहण करणे याचे 54 ठिकाणी प्रस्तावित आहे. त्यात दुस:या टप्प्यात 36 तर तिस:या टप्प्यात 18 ठिकाणांचा समावेश   आहे. प्रगती पथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याचे सात ठिकाणी प्रस्तावित असून दुस:या टप्प्यात एक तर तिस:या टप्प्यात सहा ठिकाणांचा समावेश आहे. विंधन विहीरी घेण्याचे 511 ठिकाणी नियोजन आहे. त्यात दुस:या टप्प्यात 461 तर तिस:या टप्प्यात 50 ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय तात्पुरत्या पुरक नळ पाणी पुरवठा योजना चार ठिकाणी नियोजित   आहेत. भौगोलिक परिस्थितीजिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गाव व पाडय़ांर्पयत जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे अशा ठिकाणी कूपनलिकेची यंत्रणा जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासनाला उपाययोजना करण्यास मोठी कसरत करावी लागत असते.सर्वाधिक गावे नंदुरबार तालुक्यातीलयंदा दुस:या व तिस:या टप्प्यात पाणी टंचाई जाणवणा:या सर्वाधिक गावांची संख्या ही नंदुरबार व तळोदा तालुक्यातील आहे. तर सर्वाधिक पाडय़ांची संख्या धडगाव तालुक्यातील आहे. नंदुरबार तालुक्यातील 50 गावे व एक पाडा, नवापूर तालुक्यातील 23 गावे व एक पाडा, शहादा तालुक्यातील 33 गावे व सहा पाडे, तळोदा तालुक्यातील 44 गावे, अक्कलकुवा तालुक्यातील 30 गावे व 175 पाडे आणि धडगाव तालुक्यातील 217 पाडय़ांचा समावेश आहे. एकुण 180 गावे व 400 पाडय़ांचा टंचाई निवारणार्थ 580 उपाययोजना राबविण्यात येणार       आहे.