शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा प्रकल्प कार्यालय : आदिवासी शेतकरी विविध लाभांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील साधारण 500 आदिवासी शेतक:यांचे वीज पंप, तेलपंप व पाईप आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मंजूर करण्यात आले असून, तसे आदेशदेखील शेतक:यांना देण्यात आले आहे. मात्र त्यांचे अनुदान आदिवासी विकास महामंडळामार्फत देण्यात येत असल्याने ते शेतक:यांना अजूनही मिळाले नाही. हे शेतकरी सातत्याने महामंडळाच्या कार्यालयाकडे हेलपाटे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील साधारण 500 आदिवासी शेतक:यांचे वीज पंप, तेलपंप व पाईप आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मंजूर करण्यात आले असून, तसे आदेशदेखील शेतक:यांना देण्यात आले आहे. मात्र त्यांचे अनुदान आदिवासी विकास महामंडळामार्फत देण्यात येत असल्याने ते शेतक:यांना अजूनही मिळाले नाही. हे शेतकरी सातत्याने महामंडळाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारीत       आहेत. या प्रकरणी आदिवासी विकास खात्याने तातडीने दखल घेऊन अनुदान उपलब्ध करून देण्याची अपेक्षा शेतक:यांनी व्यक्त केली आहे. आदिवासी शेतक:यांना शंभर टक्के अनुदानावर वीज पंप, तेलपंप व पाईप देण्यात येत असतात. ही योजना आदिवासी विकास विभागाचे महामंडळामार्फत राबविली जात असते. 28 हजारांचा वीजपंप व 20 हजारांना तेलपंप, 10 हजारांचे पाईप, असे अनुदान दिले जात असते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्ीची निवड आदिवासी विकास प्रकल्पामार्फत केली जाते. तथापि गेल्या 2014 पासून या योजनेचे अनुदान थकले आहे. यामुळे योजनेलाही एक प्रकारे ब्रेकच बसला आहे. गेल्या तीन वर्षापासून तालुक्यात जवळपास अशा 500 लाभाथ्र्याना येथील आदिवासी विकास प्रकल्पाने मंजुरीचे आदेश दिले आहेत. मात्र आदेश मिळूनही शेतक:यांना अनुदानाअभावी वीजपंप, कृषीपंप व पाईपपासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक प्रकल्पामार्फत शेतक:यांची प्रत्यक्ष जागेवर जावून चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचा खाते उतारा, आधारकार्ड, बँक खते पुस्तक व संबंधीत गावाचे सरपंच, तहसीलदार यांचे ना हरकत दाखले, वीज वितरण कंपनीचे दाखले आदी कागद             पत्रांची खातरजमा करून प्रकरणे           मंजूर केली आहेत. तसे मंजुरीचे आदेशही प्रत्यक्ष शेतक:यांना देण्यात आले आहेत. शिवाय शेतक:यांनी देखील आपल्या मंजुरीचे आदेश संबंधीत आदिवासी विकास महामंडळाचे नंदुरबार येथील उपप्रादेशिक कार्यालयात जमा केले आहेत. तथापि त्यांना अजूनही या वस्तुंसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. अनुदानासाठी हे शेतकरी सातत्याने कार्यालयाकडे हेलपाटे मारीत आहेत. यात शेतक:यांचा पैसा व वेळदेखील वाया जात आहे. तरीही हाती काहीच लागत नसल्याची व्यथा या शेतक:यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो रुपये खर्च करीत असल्याचा दावा करते तर दुसरीकडे योजना राबवितांना प्रत्यक्षात त्याचा निधी उपलब्ध करून देत नसल्याची स्थिती आहे. परिणामी आदिवासींना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. तब्बल तीन वर्षापासून या योजनेचे अनुदान थकल्यामुळे आदिवासी शेतक:यांनादेखील सिंचन सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आदिवासी विकास खात्याचा मंत्र्यांनी थकलेल्या या अनुदान प्रकरणी लक्ष घालून शेतक:यांचा हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.