शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

तळोदा पोलीस ठाण्यात वाहन नसल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:13 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. वाढता ताण लक्षात घेवून वरिष्ठ प्रशासनाने तातडीेने पुन्हा एक वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. वाढता ताण लक्षात घेवून वरिष्ठ प्रशासनाने तातडीेने पुन्हा एक वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे.तळोदा येथील पोलीस ठाण्यास तळोदा तालुक्यातील 128 गावे जोडली आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातील तळोद्याच्या सीमेस लागून असलेली नऊ गावेदेखील जोडलेली आहे. या पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ 66 मैलार्पयत विस्तारलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा ठाणे असे एकमेव आहे की, ज्याच्यात दोन तालुक्यातील गावांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. सदर पोलीस ठाण्यास बोरद, मोदलपाडा व कोठार अशा तीन दूरक्षेत्रांचादेखील बंदोबस्ताच्या पाश्र्वभूमिवर विभागणी करण्यात आली आहे. साहजिकच सातपुडय़ातील माळखुर्द, एकधड, बोरवन, टाकली, अशा अनेक गावे अन् पाडय़ांचा समावेश या ठाण्यात आहे, असे असले तरी या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस विभागाकडून एकच वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे याच पोलीस गाडीवर एवढा मोठा बंदोबस्ताचा गाडा कसा तरी सुरू आहे.साहजिकच पोलिसांनाही यातून मोठी कसरत करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी लागत आहे. वास्तविक पोलीस ठाण्याचा वाढता विस्तार पाहता येथे दुस:या चारचाकी वाहनाची अत्यंत आवश्यकता असताना पोलीस प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. दुस:या वाहनाबाबत येथील पोलीस प्रशासनाने प्रस्ताव पाठविला होता. मात्र कायम स्वरूपी वाहन उपलब्ध करून न देता तात्पुरते वाहन दिले जाते. नंतर पुन्हा ते परत मागवून घेण्यात येते. गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरात घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. वसाहतींमध्ये सातत्याने होणा:या घरफोडय़ा आता शहराच्या मध्यभागीदेखील होऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. मात्र एकाच वाहनावर ते अशक्य आहे. त्यातही तालुक्यात ग्रामीण भागात रात्री-बेरात्री मारामारी, दंगल, अशा घटना घडल्या तर पोलिसांना तेथे जावे लागते, अशा वेळी पोलिसांना आपल्या खाजगी दुचाकीने रात्रीची गस्त घालावी लागत आहे. गृहविभागाने पोलीस ठाण्यास आणखीन एक चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले तर दुर्घटना अथवा मारामारी दंगलीच्या ठिकाणी लवकर पोहोचता येईल. शिवाय घटनांवरही काबू राखता येईल. त्याचबरोबर तपास कामातही तातडीने गती मिळेल. एकाच वाहनामुळे तासन-तास वाट पहावी लागते, अशीही पोलिसांची व्यथा आहे. जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना वरिष्ठ प्रशासनाकडून दोन वाहने दिलेली आहेत. परंतु तळोदा पोलीस ठाण्यालाच केवळ एकमेव गाडी देण्यात आलेली आहे. तळोद्याच्या बाबतीत प्रशासनाचा अशा दुजाभाव का केला जात आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला तर अशा वेळी दुस:यांकडून वाहन मागविण्यात येत असते. दुस:या वाहनाअभावी येथील पोलिसांचा वाढता ताण कमी करण्यासाठी गृहविभागाने गंभीर दखल घेवून तातडीने वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.