शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

स्ट्राँग रुम कडेकोट सुरक्षेच्या घे:यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार  पडले असून सहा विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन वखार महामंडळाच्या गोदामातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून सहा विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे मंगळवारी दुपारी तीन वाजेर्पयत सुरु होती. मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएममशीन या त्यांच्या-त्यांच्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक विधानसभानिहाय तेथून गेलेल्या ईव्हीएम, परत आलेल्या ईव्हीएम याची मोजणी झाली.सर्व व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रत्येक बुथनिहाय ईव्हीएम मशीन कंटेनरमध्ये व्यवस्थित लावून सील बंद करण्यात आले. येथील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँग रूममध्ये रात्री उशिरा सुरू होऊन मंगळवारी दुपार्पयतही प्रक्रिया चालत होती. सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जातीने हजर होते. स्ट्राँग रूम सुरक्षेच्या घे:यात राहणार आहे. मंगळवारी सकाळपासून वाहने येऊ लागली होती. सर्वाना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. केंद्रीय निरिक्षक तसेच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी पुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनची वाहतूक खुल्या वाहनातून न करता बंदिस्त असलेल्या वाहनातून करावी. तसेच वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व विधानसभा मिळून जवळपास 12 वाहनांचा उपयोग करण्यात आला. यासर्व वाहनांना आवश्यक सुरक्षा पुरविण्यात आली होती. जीपीएस यंत्रणा होती. नंदुरबारातील गोदामात ते दाखल झाले.गोदामाच्या चारही बाजूंनी कटेकोट बंदोबस्त आहे. स्ट्राँग रुम त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेने वेढले आहे.  स्ट्राँग रुम असलेले दोन्ही मुख्य गोदाम आहे, ते केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा:या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सुरक्षा घे:यात आहे. त्यानंतर चारही बाजूंनी राज्य राखीव पोलीस दलाचा आणि स्थानिक पोलिसांचा घेरा आहे.  याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. इतकेच नव्हे तर ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, तिथे आयोगाच्या निर्देशानुसार कुठल्याही प्रकारची लाईव्ह वायरिंग नाही. म्हणजे संपूर्ण गोदाम हे अंधारात राहील. आतमध्ये कुठल्याही प्रकारचा लाईट सुद्धा न लावण्याच्या सुचना असल्याचे संबधीत अधिका:यांनी सांगितले. वखार महामंडळाचे गोदाम हे शहराच्या मुख्य भागात आहे. दोन बाजुला वसाहत तर एका बाजुला शासकीय आयटीआय आहे. दोन्ही बाजुला मुख्य रस्ते आहेत. त्यामुळे सुरक्षेची अधीक काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. कोणाला घेता येणार सुरक्षेचा आढावा? कळमना येथील ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. त्या परिसरात कुणालाही जाण्याची परवानगी नाही. परंतु लोकसभा निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या सुरक्षित आहेत किंवा नाही, याचा आढावा घ्यायचा असेल तर त्यांना ते पाहता येऊ शकेल.त्याची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी येथे एक लॉग बुक सुद्धा ठेवलेले आहे.