नंदुरबार : जुलै महिना म्हटला म्हणजे पावसाची संततधार व नेहमीच ढगाळ वातावरण, यंदा मात्र जुलै महिन्याने ऑक्टोबर हीटचा अनुभव जिल्हावासीयांना दिला. तापमान ३८ ते ३९ अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे जुलै महिना चांगलाच ‘तापदायक’ ठरला आहे. मागील काही वर्षांनंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात तापमानाचा पारा वाढला आहे.
यंदा पाऊस लांबला आहे. जून महिना कोरडा गेला. जुलैचा पहिला आठवडा देखील कोरडाच गेला. पाऊसच पडला नसल्याने व ढगाळ वातावरणही फारसे राहत नसल्याने तापमानाची तीव्रता कायम राहिली. जून व व जुलै महिन्यात सरासरी तापमान ३८ ते ३९ अंशापर्यंत पोहचले होते. तापदायक ऊन आणि असह्य उकाडा भरपावसाळ्याच्या महिन्यात जिल्हावासीयांनी यंदा अनुभवला. गेल्या दोन दिवसांपासून तापमान कमी झाले आहे.
सरासरी तापमानात चार अंशांची वाढ
nजुलैमधील सरासरी तापमानापेक्षा यंदा चार अंशांनी जास्त तापमानाची नोंद झाली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात ३२ ते ३४ अंश इतके सासरी तापमान नोंदवले जाते. यंदा तापमानाचा पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचला आहे.
nयापूर्वी २०१४ साली जुलै मध्ये ३८.०० इतके तापमान नोंदवण्यात आले होते. २०१८ साली ३६ तर तर २०११ साली ३७ अंश तापमान नोंदवण्यात आले होते.