नंदुरबार : यात्रोत्सव काळात प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनचालकाकडून ८०० रुपयांची लाच स्विकारतांना अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहात ताब्यात घेतले.अक्कलकुवा येथे कालिका मातेचा यात्रोत्सव सुरू आहे. या यात्रोत्सवात अक्कलकुवा येथील चारचाकी वाहनचालक अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असल्याचे सांगून हवालदार रवींद्र सनसिंग ठाकरे यांनी ठाकरे यांच्याकडे ८०० रुपयांची मागणी केली. याबाबत चालकाने नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.चालकाकडून हवालदार ठाकरे यांनी २१ रोजी दुपारी अक्कलकुवा पोलीस ठाणे आवारातच ८०० रुपयांची लाच स्विकारली. यावेळी सापळा लावलेल्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक भिागाचे उपअधीक्षक शिरिष जाधव, निरिक्षक करुणाशील तायडे यांच्यासह पथकाने केली.
८०० रुपयांची लाच घेतांना हवालदार रंगेहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 21:05 IST