नंदुरबार : पावसाळ्यात जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वेळोवेळी समोर येते. हिवताप विभाग यासाठी प्रयत्न करत असला, तरी जिल्ह्यात अद्याप डेंग्यूचे रुग्ण आढळून येणे कमी झालेले नाही.
पावसाळा सुरू झाल्याने यंदाही डेंग्यूचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात नको तेथे पाण्याचा साठा डेंग्यूचा फैलाव करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
कोरडा दिवस पाळा
पावसाळ्यात डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता असते. यातून नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. कोरडा दिवस पाळला पाहिजे. किरकोळ लक्षणे दिसल्यानंतर चाचण्या करून आरोग्य विभागाला कळवले पाहिजे.
- डॉ. रविंद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी
अंगदुखी व ताप
कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये ताप जास्त प्रमाणात येतो तसेच अंगदुखीचा त्रास होतो.
कोरोनामध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण अधिक असते. डेंग्यूमध्ये मात्र सर्दी, खोकला होत नाही.
डेंग्यूमध्ये डोळे दुखतात. कोरोनाच्या काही रुग्णांमध्येही अशी लक्षणे आहेत.
पाणी उकळून प्या
पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे आजार बळावतात. म्हणून पाणी उकळूनच प्यावे.
जिल्ह्यातील जलस्रोतांची आरोग्य विभागाने तपासणी केली होती. त्यात १३ गावातील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले होते.