शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नंदुरबारात ‘दुष्काळ’ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:11 AM

उपोषण व निवेदन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकवटले

नंदुरबार :  जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा आणि रखडलेल्या पाणी प्रकल्पांना निधी उपलब्ध करून कामांना सुरुवात करावी यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले, त्यानंतर उपोषणाला सुरुवात करण्यात आली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे यापूर्वी तालुकास्तरावर मोर्चे काढण्यात आले होते. आता जिल्हास्तरावर उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घन:शाम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तसेच उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दुष्काळ तातडीने जाहीर करावा व त्या अनुषंगाने असलेल्या सवलती शेतक:यांना उपलब्ध करून द्याव्या अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कापूस ही पीके घेतली जातात. यंदा पजर्न्यमान अत्यंत कमी झाल्यामुळे या पिकांना फटका बसला आहे. उत्पादनात 50 टक्केर्पयत घट आली आहे. सध्या शेतात असलेली पीके पाण्याअभावी जळत आहेत. ही पीके हातून गेल्यानंतर येत्या 16 महिन्यात कुठलीही पीके शेतक:यांच्या हाती येणार नाहीत हे स्पष्टच आहे. शेतीवर आधारीत पुरक उद्योग देखील ढेपाळला आहे. जिल्हाभरातील पाण्याची पातळी देखील खालावली आहे. जिल्ह्यात झालेले सिंचन प्रकल्प शेतक:यांच्या शेतार्पयत पाणी पोहचविण्यात अपयशी ठरले आहेत. चौपाळे गावात पाण्यासाठी आंदोलन झाले तेथे शेतक:यांवर लाठीमार आणि अश्रूधूर सोडण्यात आले. शेतक:यांना कुणी वालीच नाही हे यावरून सिद्ध होते. मागण्या मान्य होत नाहीत तोर्पयत उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळाच्या दाहकतेमुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले व कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याची जबाबदारी प्रशासन राहणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.