शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुले पकडणारा असल्याच्या संशयावरून गडद येथे एकाला चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 13:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : मुले पळविणा:या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरून शहरानजीकच्या गडद येथे दोन इसमांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. घटनास्थळी पोलीस वेळेवर दाखल झाल्याने पुढील अनर्थ   टळला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गडद येथे दोन अज्ञात इसम दिसून आल्याने मुले पळविणारे असे समजून त्यांना नागरिकांकडून विचारणा करण्यात आली. संशयावरून त्यांना नागरिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : मुले पळविणा:या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरून शहरानजीकच्या गडद येथे दोन इसमांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. घटनास्थळी पोलीस वेळेवर दाखल झाल्याने पुढील अनर्थ   टळला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गडद येथे दोन अज्ञात इसम दिसून आल्याने मुले पळविणारे असे समजून त्यांना नागरिकांकडून विचारणा करण्यात आली. संशयावरून त्यांना नागरिकांच्या रागाला सामोरे जावे लागून मार खावा लागला. पोलिसांनाही याबाबत अवगत करुन देण्यात आल्याने पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक संगीता कदम व कर्मचारी घटनास्थळी दाखल  झाल्याने दोघे बचावले. या दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आल्यानंतर ते दोघे मुले पळवून नेणारे नसल्याचे स्पष्ट      झाले.दरम्यान ही वार्ता शहरात वा:या सारखी पसरल्याने नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात तोबा गर्दी केली. मुले पळविणारे कोण आहेत? ते दिसतात कसे? पोलिसांकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जात आहे?  हे जाणून घेण्यासाठी पुरुषांसह महिलांनीही एकच गर्दी केली. पोलिसांकडून नागरिकांची समजूत काढण्यात आल्यानंतर गर्दी मागे फिरली. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असून यामुळे अनेकांना विनाकारण मार खावा लागत आहे. पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी सोशल मीडियावर संदेश पाठवून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नवापूर तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुलांना चोरणारी टोळी आली आहे अशी अफवा सोशल मिडियावर शेअर होत आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांना नवापूर पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येते की, नवापूर शहरासह तालुक्यात कुठेही लहान मुलांना चोरून नेणारी टोळी अथवा चोरटे आलेले नाहीत. केवळ काही लोकांकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. तरी अफवांवर विश्वास न ठेवता अशा प्रकारची संशयीत व्यक्ती मिळून आल्यास त्यांना मारहाण न करता नवापूर पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे म्हटले आहे.