लोकमत न्यूज नेटवर्ककोठार ता़ तळोदा : धडगाव तालुक्यातील वडफळ्या येथील 53 वर्षीय महिलेला डाकीण असल्याच्या संशयातून ठार मारण्याची घटना घडल्याने डाकीणचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आह़े दरम्यान 14 रोजी रात्री आठ वाजता घडलेल्या घटनेनंतर महिलेचा खून करुन फरार झालेल्या सुकलाल मुडकू पावरा यास पोलीसांनी ताब्यात घेतले आह़े मंत्र-तंत्राच्या जादूटोणा सहाय्याने मुलाला आजारी पाडल्याचा संशय घेत सुकलाल पावरा याने चुलत भावजयीचा बळी घेतला होता़ डाकीण असल्याच्या संशयातून यापूर्वीही पावरा याने महिला व तिच्या कुटूंबियांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती़ यामुळे महिलेस कुटूंबिय भितीत होत़े 14 रोजी किरकोळ वाद घालत सुकलाल याने लाकडी दांडा थेट महिलेच्या डोक्यात घालून तिला ठार केल़े गेल्या आठवडय़ातच डाकिणीच्या संशयावरून अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथे महिलेला मारहाण करण्याची घटना ताजी असताना घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आह़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर धडगाव पोलीसांसह अंधश्रद्धा निमरुलन समितीच्या कार्यकत्र्यानी वडफळ्या येथे भेट दिली होती़ दरम्यान 2013 पासून पारित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम या कायद्यांतर्गत जिल्ह्यात आजवर आठ गु्न्ह्यांची नोंद करण्यात आली आह़े धडगाव तालुक्यातील घटनेने ही संख्या नऊवर पोहोचली आह़े या प्रतिबंधक कायद्यांतर्गत धडगाव तालुक्यात चार गुन्हे यापूर्वी दाखल होत़े उमरकुवा ता़ अक्कलकुवा येथे महिलेस मारहाणी केल्यानंतरही पोलीसांनी याच कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तसेच नंदुरबार शहरात या कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत़ या प्रकरणांचा पोलीस दलाकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
डाकीणच्या संशयातून भावजयीला ठार मारणारा संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 11:59 IST