लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील योगेश पाटील यांच्या शेतात मजूर निंदणीचे काम करीत असताना एका मजुरास भला मोठा साप दिसला. त्यांनी त्वरित शेतमालक योगेश पाटील यांना सांगितले. योगेश पाटील यांनी सारंगखेडा येथील सर्पमित्र सागर राजपूत आणि निलेश नाईक यांना संपर्क केला.सर्पमित्र सागर राजपूत, विशाल ठाकरे, नीलेश नाईक व आकाश नाईक यांनी शेतात जाऊन बघितले असता तेथे जवळपास सहा ते सात फूट लांबीचा अजगर होता. या अजगराच्या तोंडाजवळ एक जखम होती. त्यांनी अजगरास सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यालयात आणले. त्याच्यावर सर्पमित्र अविनाश पाटील यांनी उपचार केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सागर निकुंभे, उपाध्यक्ष भीमसेन रावताळे, सचिव हितेश पाटोळे आदी उपस्थित होते. नंतर वनविभागात नोंद करून अजगरास निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.
जखमी अजगरास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:44 IST