शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे ऊस क्षेत्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:48 IST

सातपुडा साखर कारखाना : ऊस तज्ज्ञांकडून शेतक:यांना मार्गदर्शन

शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे आयोजित ‘सातपुडा मिशन 100’ या कार्यक्रमांतर्गत चिखली दिगर येथील चंद्रसिंग नाईक यांच्या ऊस क्षेत्रावर नवीन वाणाच्या बेणेमळ्यातील उसाची पाहणी करण्यात आली.या वेळी कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी ऊस उत्पादक सभासदांना मार्गदर्शन करतांना ऊस उत्पादन वाढ करावयाची असेल तर यापुढे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी सभासदांनी केला पाहिजे. सध्याची ऊसाची परिस्थिती लक्षात घेता, पीक संरक्षण उपाययोजनांमध्ये जैवीक किटकनाशकांचा वापर सर्वच ठिकाणी वाढला पाहिजे, असे सांगितले.कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सांगितले की, ऊस लागवडीचे 2018-19 चे नियोजन प्रत्येक सभासद शेतक:यांना देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे या हंगामात आडसाली उसाची लागवड 15 जुलैपासून करावी.  या हंगामासाठी नोंद केलेल्या उसाच्या गाववार याद्या प्रत्येक गावातील सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालयात पाहण्यासाठी लावलेल्या आहेत. त्यात काही तक्रारी असल्यास 30 जूनर्पयत जवळच्या गटकार्यालय व केंद्र कार्यालयात आपल्या तक्रारी नोंदवाव्यात .गेल्या हंगामामध्ये साखरेचे दर कमी झाले असले तरी चेअरमन दीपक पाटील व संचालक मंडळाने जाहीर केलेल्या दराप्रमाणेच शेतक:यांचे उसाचे पेमेंट अदा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन डॉ.सुरेश नाईक यांनी केले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शशिकांत गोविंद पाटील, विठ्ठल पाटील, सुभाष देविदास पाटील, गोपाळ शंकर पाटील, डॉ.गणेश पाटील, सुदाम कुवर, सरवरसिंग पटले, कारखान्याचे गट कर्मचारी गोकूळ बोरसे, विलास पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांनी तर आभार मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत यांनी आभार मानले.दरम्यान, कारखान्यामार्फत म्हसावद, मोड, फेस या गावामधील आडसाली ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला.