शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

हरित लवादाच्या आदेशाने पूररेषेतील 108 गावांचे सव्रेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 11:57 IST

10 नदीनाले : लाल पट्टय़ातील गावांमध्ये होणार उपाययोजना

नंदुरबार : 2006 नंतर जिल्ह्यातून वाहणा:या नद्यांना महापूर आलेला नसला तरी वेळोवेळी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना मोठय़ा संकटांना तोंड द्यावे लागत होत़े यातून राष्ट्रीय हरीत लवादाने नंदुरबार जिल्ह्यातील नदीकाठच्या 108 गावांचे सव्रेक्षण करण्याचे आदेश दिले होत़े गेल्या वर्षात काढलेल्या आदेशानंतर हे सव्रेक्षण पूर्ण झाले असून लवकरच त्याचा निष्कर्ष समोर येणार आह़े     लवादाने काढलेल्या आदेशानंतर सर्व सहा तालुक्यातून वाहणा:या 10 नदी-नाल्यांच्या काठावरील गावांच्या सव्रेक्षणासाठी निधीही दिला होता़ यातून दोन स्वतंत्र निविदा काढल्या गेल्या होत्या़ यानुसार पाटबंधारे विभागाच्या धुळे येथील कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार नंदुरबार, शहादा उपविभागात हे सव्रेक्षण पूर्ण  झाल्याची माहिती आह़े नंदुरबार तालुक्यातील 26, शहादा 41, नवापूर 8, अक्कलकुवा 9 तर धडगाव तालुक्यातील 24 अशा 108 अशा लाल पट्टय़ातील गावांमध्ये हे सव्रेक्षण झाले आह़े त्याचा अहवाल शासनाला दिल्यानंतर लाल पट्टय़ातील गावांमध्ये उपाययोजनांचा आराखडा तयार करुन निधी देण्यात येणार असल्याची माहिती आह़े पावसाळ्यापूर्वी या कामांना सुरुवात झाल्यास यातील अनेक गावे ही पूररेषेत येऊनही सुरक्षित राहून चांगल्या दर्जाच्या दीर्घकाळ टिकणा:या उपाययोजना करणे शक्य होणार आह़े सव्रेक्षणाच्या दुस:या टप्प्यात अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदीच्या पाणलोट क्षेत्रात येणा:या मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, गमन, सिंदुरी, बामणी, मुखडी, डनेल, मांडवा, तर धडगाव तालुक्यातील पौला, पिंपळचौक, शेलगदा, अट्टी, केली, थुवाणी, चिंचखेडी, भरड, शिक्का, रोषमाळ खुर्द, डोमखेडी, निमगव्हाण, सुरुंग, शेलदा, जुनवणे, खर्डी, माळ, बिलगाव, साव:या दिगर, भूषा, वरवली, सादरी, उडद्या आणि भादल या गावांमध्ये सव्रेक्षण केल्याची माहिती आह़े हरित लवादाने निधी दिल्यानंतर सूचित केलेल्या अटी-निकषानुसार हा कार्यक्रम राबवण्यात आल्याची माहिती आह़े जिल्ह्यात तापी नदी काठावर सावळदे, कोरीट, सुजालपूर, बोराळे, नाशिंदे, हाटमोहिदे, अमळथे, ओसर्ली, खापरखेडा, आराळे, कोपर्ली ता़ नंदुरबार, तर शहादा तालुक्यातील जावदे, तोरखेडा, दोंदवाडे, फेस, खैरवे, भडगाव, टेंभे, कामखेडा, सारंगखेडा, खरवड, कौठळ, बामखेडा, बिलाडी, ससदे, शेल्टी, पळासवाडे, नांदरखेडा प्रकाशा, नंदुरबार तालुक्यातून वाहणा:या चांदवा नाल्या काठावरील कोरीट, समशेरपूर, सावळदे, बोराळे, सुजालपूर व नाशिंदे, शिवण नदी काठावरील करणखेडा, सुंदर्दे, आष्टे, ओझर्टे, घोगळगाव, अंबापूर, अजेपूर, खामगाव, विरचक, बिलाडी, रंका नाल्याकाठचे कोठडे व धानोरा, सुकई नदी काठाला लागून असलेले उमर्दे खुर्द ही गावे पूररेषेत गणली जातात़ शहादा तालुक्यात गोमाई नदी काठावरील जावदे, जाम, ओझर्टे, धामलोदे, तिधारे, गोगापूर, जवखेडा, भागापूर, टुकी, कवळीथ, पाडळदा, आसुस, होळ, टेंभली, लोणखेडा, मलोणी, शहादा, कुकडेल, पिंगाणे, मनरद, लांबोळे, करजई, बुपकरी, डामरखेडा, नवापूर तालुक्यातील रंगावली नदी काठावर वडकळंबी, चौकी, रायपूर, मोरथुवा, विजापूर, नंदवन, बोकळझर ही गावे पूररेषेत गणली जातात़ या सर्व गावांमध्ये हे सव्रेक्षण पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात आले होत़े ही सर्व गावे लाल पट्टय़ातील असल्याने नदीकाठावरची धोकेदायक बांधकामे आणि इतर अतिक्रमित बांधकामे यांची माहिती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े