शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आधार सुटलेल्या काँग्रेसला टेंभलीचा ‘आधार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:54 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशात काँग्रेस सरकारच्या राजवटीत आधार योजनेचा ज्या टेंभली, ता.शहादा या गावात ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशात काँग्रेस सरकारच्या राजवटीत आधार योजनेचा ज्या टेंभली, ता.शहादा या गावात शुभारंभ झाला ते टेंभली गाव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे आजही उभे राहिल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत अनेक बडय़ा काँग्रेस नेत्यांच्या गावांमध्ये भाजपला मताधिक्क्य असताना टेंभली गावातील जवळपास 85 टक्के मतदारांनी काँग्रेसला साथ दिली.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात टेंभली, ता.शहादा हे गाव 10 वर्षापूर्वी संपूर्ण भारतात चर्चेत आले. कारण त्याकाळी काँग्रेसची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आधार कार्डची योजना टेंभली, ता.शहादा या गावापासून सुरुवात झाली. त्यासाठी तत्कालिन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग व काँग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी ह्या आल्या होत्या. या योजनेच्या शुभारंभानंतर सलग 10 वर्षे हे गाव योजनांच्या दुरवस्था व विविध प्रश्नांबाबत चर्चेत राहिले. विशेष म्हणजे गावात पंतप्रधान आल्यानंतरही काही दिवसातच या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यांना सरकारी योजनेअंतर्गत दिलेले वीज मीटर काढून घेण्यात आले होते. त्यामुळे तेव्हा हा मुद्दा प्रचंड गाजला होता. दुसरीकडे काँग्रेसनेही आधार योजना दुय्यम केली. उलट त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने या योजनेचे महत्त्व वाढवले. असे असतानाही गावाने मात्र आजही आपला विश्वास काँग्रेसवरच असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. त्याला कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत टेंभली येथील मतदान केंद्रावर काँग्रेसला जवळपास 85 टक्के मतदान झाले. याठिकाणी झालेल्या एकूण 758 मतदानापैकी 646 मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी. पाडवी यांना मतदान केले आहे. तर भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावीत यांना केवळ 69 मते मिळाली आहेत. इतर उमेदवारांना एक ते तीन मते मिळाली तर 20 मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारत नोटाला मतदान केले आहे.एकीकडे या मतदारसंघातील काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांच्या गावातही काँग्रेसला भाजपपेक्षा आघाडी घेण्यात यश आले नसताना टेंभली गावाने दिलेली काँग्रेसची साथ ही अनेक अर्थाने राजकारणात चर्चेत आली आहे.