शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १० मध्ये स्वयंसेवकांद्वारे वस्तंूचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील सील करण्यात आलेला प्रभाग क्रमांक १० अनिश्चित काळासाठी सील राहणार आहे़ येथील कोरोनाबाधित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील सील करण्यात आलेला प्रभाग क्रमांक १० अनिश्चित काळासाठी सील राहणार आहे़ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १९ जणांचे अहवाल नेगेटीव्ह आले असले तरी अद्याप काहींचे रिपोर्ट हे बाकी आहेत़ त्याच्या कुटूंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने पावले उचलत या भागात नागरिकांना सूचना करण्यात येत आहेत़शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील एकास कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती़ या पार्श्वभूमीवर हा परिसर शनिवारपासून पूर्णपणे सील करण्यात आला आहे़ मंगळवारपासून ग्रीन झोन मध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेश अधिसूचना जारी करण्यात येऊन औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र तसेच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत काही नियम शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे़ यामुळे मंगळवारपासून शहर आणि जिल्ह्यातील जीवनमान काही प्रमाणात सुरळीत होणार आहे़ परंतू प्रभाग क्रमांक १० ला या अधिसूचनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ सोमवारी दुपारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी या भागात भेटी देत माहिती घेतली होती़ यानुसार १ किलोमीटरचा हा परिसर पूर्णपणे सील राहणार आहे़ या भागात राहणाºया नागरिकांची गैरसोय टाळता यावी यासाठी ५० घरांमागे एक स्वयंसेवी आणि शासकीय कर्मचारी यांची पथके नियुक्त करण्यात येणार आहेत़ स्वयंसेवकांची ही पथके मंगळवारपासून कार्यरत होणार असल्याची माहिती आहे़ यात शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे़ हा परिसर तब्बल एक किलोमीटरवर विस्तार आला आहे़ या परिसरावर पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन यांचे बारीक लक्ष असून येथून बाहेर पडणे किंवा आत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे़ या भागात पालिकेकडून निर्जंतुकीकरण सुरु असून जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत हा परिसर सील असेल, अशी माहिती आहे़

या भागात साधारण ९५० कुटुंब असून ४ हजार ६३२ नागरिक राहतात़ या क्षेत्राला १८ उपक्षेत्रात विभागण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी एक पथक कार्यरत करण्यात आले आहे. प्रत्येक उपक्षेत्रात नगर पालिका कर्मचारी किंवा शिक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. हे पथक सकाळी ८ ते १० या वेळेत रहिवाशांकडून आवश्यक वस्तूंची माहिती घेईल़ आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान दरम्यान या वस्तू घरपोच पोहोचविण्यात येतील. दूधाचे वितरण घरोघरी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जावू नये आणि कोणत्याही कामासाठी बाहेर पडू नये. त्यांना समस्या असल्यास मंडळ अधिकारी झेड.एम. पठाण यांना ९१४५२०२२०५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे़