शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन राज्यांच्या सिमेवर ‘सुपर वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:49 IST

२४ तास दक्षता : निवडणुकीत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासनातील अधिकारी सजग

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातच्या सिमेलगतची ३१ व मध्यप्रदेशच्या सिमेलगतच्या १२ गावांकडे जिल्हा प्रशासनाने विशेष नजर ठेवली आहे. जिल्ह्यातील काही गावांना जाण्यासाठी गुजरातची सिमा वेळोवेळी ओलांडावी लागत असते. ही बाब लक्षात घेता सिमावर्ती भागात खास चेकपोस्ट तयार करण्यात आली असून गस्ती वाहने तैणात करण्यात आली आहेत. मतदार संघातील गावांनाच जाण्यासाठी दुसऱ्या राज्याची सिमा वारंवार ओलांडावी लागणार असलेला नंदुरबार हा राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे हे विशेष.नंदुरबार हा गुजरात व मध्यप्रदेश राज्यांच्या सिमेवर वसलेला जिल्हा आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ निर्मितीच्या वेळी तापी पट्टयातील गुजरातची अनेक गावे थेट २० ते २५ किलोमिटर आत घुसली. त्यामुळे या गावांना जाण्यासाठी किंवा या गावांच्या पुढे असलेल्या जिल्ह्यातील गावांना जाण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सिमा वारंवार ओलांडव्या लागतात. या भौगोलिक परिस्थितीमुळे सिमेलगतच्या दोन्ही राज्यातील गावांमधील लोकांमध्ये सांस्कृतिक व सामाजिकदृष्टया वेगळेच नाते निर्माण झाले आहे. या बाबीचा फायदा मात्र, अवैध धंदेवाले व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकंही घेत असतात. एका राज्यात गुन्हा करून लागलीच दुसºया राज्यात जाण्यासाठी ते सोयीचे ठरते. शिवाय अवैध मद्य वाहतुकीसाठीही हा भाग संबधितांना मोठा सोयीचा ठरत आहे.मध्यप्रदेशलगतच्या शहादा तालुक्यातील अनेक गावांमध्ये देखील ही समस्या कायम आहे. या भागात तर अवैध मद्य निर्मितीचे कारखानेच अनेकवेळा उध्वस्त करण्यात आलेले आहे. ही बाब लक्षात घेता निवडणुकीच्या काळात विशेष दक्षता घ्यावी लागत आहे.सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर तिन्ही राज्यांमधील लगतच्या जिल्ह्यामधील प्रमुख अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत यावर मोठा खल करण्यात आला. निवडणुकीत गुंड आणि असामाजिक तत्वांचा उपद्रव होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी १६ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. पोलिसांची गस्ती वाहने देखील नजर ठेवून आहेत. नंदुरबारसह गुजरातचा तापी, डांग, नर्मदा जिल्हा आणि मध्यप्रदेशचा बडवानी जिल्ह्यातील पोलिसांनी संयुक्तरित्या समायोजन केले आहे. त्यातून माहितीची देवानघेवान देखील होत आहे. २९ रोजी मतदान होत आहे. त्यामुळे नंदुरबार पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे.