शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेबाबत मानवी हक्क आयोगाचे आरोग्य सचिवांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:27 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवेच्या खालावलेल्या दर्जाबाबत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आलेल्या ...

  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवेच्या खालावलेल्या दर्जाबाबत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार १७ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे सुनावणी ठेवण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य सचिव व जिल्हाधिका-यांना उपस्थित राहण्याचे बजावण्यात आले आहे.  दरम्यान याबाबत ‘लोकमत’नेही गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य        सेवेवर वेळोवेळी  वृत्त प्रकाशीत केले होते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय राजपूत यांनी पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धडगाव तालुका तसेच नंदुरबार जिल्ह्यातील इतर सर्व मागास तालुक्यात आरोग्य सुविधांची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. औषधी, आरोग्य कर्मचारी तसेच ॲम्बुलन्स व ऍम्ब्युलन्ससाठी लागणारा रस्ता या सर्वच मूलभूत सुविधांची आदिवासी तसेच मागास भागात वानवा आहे, स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपावेतो या जिल्ह्याकडे किंवा जिल्ह्याच्या समस्याकडे कोणीही सकारात्मकतेने बघितले नाही, या अतीमागास भागातील नागरिकांना आरोग्य, दळणवळण यासारख्या मूलभूत सुविधा न मिळणे म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. ॲम्बुलन्स नसल्याकारणाने बांबूच्या झोळीत रुग्णास दवाखान्यापर्यंत नेले जाते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनामार्फत या मागास भागातील आदिवासी बांधवांना आरोग्यसुविधा न पुरवणे म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांना हिरावणे म्हणता येईल, यासाठी संपूर्णपणे जबाबदार आरोग्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते.यासंबंधी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत यांनी २२ सप्टेंबर रोजी  तक्रार दाखल केली होती. यानंतर सदर आयोगामार्फत ही तक्रार राज्य मानवी हक्क   आयोगाकडे वर्ग करण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन राज्य       मानवी हक्क आयोगा द्वारे १७ नोव्हेंबर रोजी सुनावणी लावण्यात आली    आहे. या सुनावणीसाठी राज्याचे आरोग्य विभागाचे सचिव यांना       हजर राहण्याचे आदेश सदर विभागामार्फत देण्यात आले आहेत तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देखील राज्य मानवी हक्क आयोगाने समस पाठवला असून मानवी हक्क आयोगाद्वारे गंभीर दखल घेण्यात आली आहे. मानवी हक्क आयोगाने पहिल्यांदाच याची दखल घेतली   आहे.