नंदुरबार : नवापूर तालुक्यातील नावली येथे ४० वर्षीय महिलेने विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या केली़ बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली़फुलवंतीबाई अरुण कोकणी असे मयत महिलेचे नाव असून बुधवारी त्यांनी विषारी द्रव्य प्यायल्याचे कुटूंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही़
नावली येथे महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:27 IST