नंदुरबार : महिन्याभरापूर्वी अपघातात मयत झालेल्या मुलाचा विरह सहन न झाल्याने ४२ वर्षीय मातेने गळफास घेत आत्महत्या केली़ शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कडवामहू ता़ अक्कलकुवा येथे ही घटना घडली़कडवामहू येथील दिनेश वसावे यांचा १९ वर्षीय मुलगा सुरेश याचा जानेवारी महिन्यात गुजरात राज्यात अपघाती मृत्यू झाला होता़ एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने आई चंपाबाई वसावे (४२) मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात येत होते़ यातून त्यांची प्रकृती खालावली होती़ दरम्यान शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली़ शेजारच्यांना ही घटना दिसून आल्यानंतर त्यांनी चंपाबाई यांना रुग्णालयात दाखल केले होते याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले़ घटनेमुळे कडवामहू पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन शिरसाठ करत आहेत़वेडाच्या भरात एकाची आत्महत्याअक्कलकुवा तालुक्यातील भगदरीच्या लाकडाईपाडा येथे काल्या मोयला वळवी (३५) याने वेड्याच्या भरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ८़३० वाजता उघडकीस आली़ मयताने शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी सकाळी ८़३० या दरम्यान गळफास घेतल्याचा अंदाज आहे़ याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे करत आहेत़मयताच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही़
कडवामहू येथील मातेची मुलाच्या विरहात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 19:36 IST