शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण व घराची नासधूस करणा:या चौघांना दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नातेवाईकाचा खून महिलेच्या पुतण्याने केल्याचा संशयातून चौघांनी महिला व तिच्या मुलांना मारहाण करीत घराची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नातेवाईकाचा खून महिलेच्या पुतण्याने केल्याचा संशयातून चौघांनी महिला व तिच्या मुलांना मारहाण करीत घराची नासधूस केल्याच्या गुन्ह्यातील चौघांना धडगाव न्यायालयाने दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्याची संक्षीप्त हकीकत अशी : कात्रीचा कामोदपाडा, ता.धडगाव येथील रुग्याबाई बाज्या वळवी या महिलेच्या घरावर चार जणांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली होती. वेलखेडी येथील नातेवाईकाच्या मृत्यूस तुमच्या पुतण्याने केल्याचा आरोप करीत हा हल्ला करण्यात आला होता. त्यात घराचेही व घरातील सामानाचेही मोठे नुकसान करण्यात आले होते. याबाबत रुग्याबाई वळवी यांनी धडगाव पोलिसात फिर्याद दिल्याने ओल्या रुमा वळवी, नवल्या रुमा वळवी, सामा रुमा वळवी, मोग्या रुमा    वळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र हवालदार यु.पी.रावताळे यांनी धडगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केले होते. न्या. जोशी     यांच्या कोर्टात याबाबतचा खटला चालला. सर्व साक्षीपुरावे आणि पुरावे लक्षात घेता न्या.जोशी यांनी ओल्या वळवी, नवल्या वळवी, सामा वळवी व मोग्या वळवी सर्व रा.कात्रीचा कामोदपाडा यांना दोषी ठरवत त्यांना नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.आर.बी.बि:हाडे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सुरेश गावीत होते.