शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या कामांना प्राधान्य देण्याच्या नंदुरबारातील बैठकीत सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाणी टंचाईच्या कामांना आणि फाईलींना दोन दिवसांच्या आत मंजुरी द्यावी अशा सुचना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार तालुका आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.पाणी टंचाई तसेच इतर विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाणी टंचाईच्या कामांना आणि फाईलींना दोन दिवसांच्या आत मंजुरी द्यावी अशा सुचना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार तालुका आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.पाणी टंचाई तसेच इतर विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, पंचायत समिती सभापती रंजना नाईक,  उपसभापती ज्योती पाटील, जि.प.सभापती हिराबाई पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बागुल, अभियंता पी.सी.भांडेकर, सतीष वळवी, जगन्नाथ पाटील, विक्रमसिंग वळवी, बी.के.पाटील, डॉ.सयाजी मोरे, सुभाष राजपूत आदींसह तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच व इतर अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. भालेरसारख्या गावाला 12 ते 15 दिवसांनी पाणी मिळत आहे. अनेक गावांना विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करूनही टंचाई कायम आहे. याबाबत बोलतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, पाणी पुरवठय़ाच्या योजना, कामे आणि फाईलींना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिका:यांनी प्राधान्य दिले पाहिजे. दोन दिवसांच्या वर या कामांच्या फाईली पेंडींग राहू नये अशा सुचनाही त्यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पाणी टंचाईच्या कामांना प्राधान्य देत टंचाई कृती आराखडय़ातील कामे तातडीने पुर्ण करावी. जेथे विहिर, विंधन विहिर अधिग्रहणाची गरज आहे तेथे त्या कराव्या. टंचाईच्या उपाययोजनांच्या कामांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भालेर, उमर्दे, आक्राळे, वावद, सैताणे, काकर्दे, शिंदगव्हाण, लहान उमज, दुधाळे, शनिमांडळ, रनाळे, पिंपरी, नांदरखेडा यासह इतर टंचाईग्रस्त गावांचा आढावा घेण्यात आला. याशिवाय घरकुल योजना, 14 वा वित्त आयोग यासह इतर कामांचा देखील आढावा घेण्यात आला.