शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन १००’साठी ऊस उत्पादकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात ऊस पिकाची जोरदार वाढ सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकरींकडून ऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात ऊस पिकाची जोरदार वाढ सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकरींकडून ऊस पिकाचे वेळोवेळी योग्य व्यवस्थापन करण्यात येत असल्याने मिशन १०० च्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.तळोदा तालुका जिल्ह्यात सर्वाधिक ऊस पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जात असून, यावर्षीही मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. पुरेसा पाऊस झाला नसला तरीही कुपनलिकांद्वारे उसाला पाणी देणे सुरूच असून, वेळोवेळी खतांचीही मात्रा देण्यात आल्याने ऊस पीक जोमदार असून, चांगले उत्पन्न येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, शेतकरींकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी ऊस पिकाला खतांची योग्य मात्रा देऊन ऊस पिकाची बांधणी करून पाणी देण्यात येत होते. तसेच उसाच्या खालच्या भागातील वाळलेली, पिवळी पडलेली पाने काढून टाकण्यात आल्याने पाऊस येताच ऊस पीक वाढीस मदतीचे ठरले आहे. तसेच काही शेतकरींनी ऊस पीक ठिबकवर लागवड केले असून, त्यांच्याकडून रासायनिक खतांची मात्रा ठिबक संचातून व्हेंचुरीतून देण्यात येत असून, हा ऊसही जोमोन वाढला आहे. एकूण दोन महिने जोरदार पाऊस झाल्यास ऊस पिकास मोठा फायदा होणार असून, एकरी १०० उत्पादनाच्या जवळपास उत्पन्न जाऊ शकते, असे शेतऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.सुपीक शेतजमीन, योग्य ऊस लागवड पद्धत, वेळोवेी रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थीत नियोजन, ऊस पिकाचे संरक्षण याबाबत व्यवस्थापन केले अूसन, यावर्षी एकरी उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे.-योगेशराजे भोसले, शेतकरी, रांझणीऊस लागवड, बांधणी, पाणी देणे यासारख्या गोष्टी समक्ष केल्याने ऊस वाढीस फायदा झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने पूर्ण वेळ शेतातच फोकस केल्याने तसेच वेळोवेळी जाणकारांचे मार्गदर्शन मिळाल्याने ऊस पीक जोमात असून, खतांची मात्राही पुरेशा प्रमाणात देण्यात येत आहे.-किशोर भारती, शेतकरी, तळोदा