शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साखर हंगाम आता समारोपाकडे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ते अडीच लाख क्विंटल कमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखाना बंद झाला आहे. तर आयान शुगर आणि आदिवासी साखर कारखाना महिना अखेर बंद होण्याची शक्यता आहे.खान्देशात यंदा पाच कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला आहे. त्यापैकी तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना, नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना व खाजगी तत्वावरील नंदुरबार तालुक्यातील आयान शुगर या कारखान्यांचा त्यात समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात या तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती.यंदा ऊसाची कमतरता असल्यामुळे सर्वच कारखान्यांनी कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न केला होता. असे असले तरी लगतच्या गुजरात व मध्यप्रदेशातील खांडसरी आणि साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस पळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखान्याने त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी नोंद केलेला सर्व ऊस गाळप केला आहे. आणखी ऊस मिळण्याची आशा मावळल्याने कारखान्याने आपल्या गाळप हंगामाचा समारोप केला आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात साधारणत: दहा लाखापेक्षा अधीक साखर उत्पादन झाले होते. यंदा जवळपास ७ लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक साखर उत्पादन शक्य आहे.आयान शुगर कारखाना देखील पुर्ण १०० दिवस चालण्याची शक्यता आहे. कारखान्याकडे अजूनही ऊसाचा पुरवठा सुरू आहे. आदिवासी साखर कारखान्याचे जवळपास ९० दिवस सुरू ठेवण्याचे नियोजन केल्याचे समजते. कारखान्याकडे अजूनही ऊस पुरवठा सुरू आहे.पुढील वर्षी चांगला हंगामयंदा साधारणत: सरासरीपेक्षा दीडशे टक्के पाऊस झाला आहे. विहिरी, कुपनलिका यांच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे. अनेक जलप्रकल्प अद्यापही ६० ते ७० टक्केपेक्षा अधीक भरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षी तिन्ही साखर कारखान्यांना मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी ऊस लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देणे देखील सुरू ठेवले आहे.

यंदाच्या साखर हंगामात सर्वाधिक साखर उत्पादन खाजगी तत्वावरील आयान शुगर कारखाना घेणार आहे. १७ तारखेच्या अहवालानुसार कारखान्याने ३,२३,५३० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून ३,२९,८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.२८ टक्के मिळाला आहे.नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखान्याने ९९,९३३ मे.टन ऊस गाळप करून ९५,३०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला आहे. कारखाना आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे.सातपुडा साखर कारखान्याने १०.२५ सरासरी साखर उताऱ्याच्या तुलनेत २ लाख ८१ हजारापेक्षा अधीक ऊस गाळप करून २ लाख ८६ हजारापेक्षा अधीक साखर उत्पादन घेतले आहे. कारखाना सरासरी ८८ दिवस सुरू राहिला.