शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

जिल्ह्याच्या राजकारणात अचानक व्टिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:42 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कालपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात एकमुखी सत्ता गाजविणारे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक व ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कालपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात एकमुखी सत्ता गाजविणारे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक व चंद्रकांत रघुवंशी यांना मात्र जिल्हा परिषद सभापती निवडीत अपयशाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजपत रात्रीतून अनोखा समझोता झाल्याने जिल्ह्यातील राजकारणातच अचानक टिष्ट्वस्ट आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्याचे राजकारण आगामी काळात वेगळ्या दिशेने वळण घेणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत.विधानसभा निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी केलेले पक्षांतर त्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीचा महाआघाडीने केलेले सत्तांतर यामुळे जिल्ह्यातील राजकारणाची अक्षरश: खिचडी झाली आहे. स्थानिक पातळीवरील संबध, पक्षाशी केलेली तडजोड आणि त्यातच राज्यातील सत्तेची वेगळी महाआघाडी यामुळे बहुतांश नेत्यांची गोची झाली आहे. त्यामुळे नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी व आपसातील संबध आता हळूहळू उघड होऊ लागले असून राजकारणाची दिशाही स्पष्ट होऊ लागली आहे.विधानसभा निवडणूक काळात काँग्रेसचे तत्काली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदारकीचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश केल्याने तेथेच राजकारणाला एक वेगळा मोड आला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही नवापूर विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या गुरु-शिष्याच्या राजकीय भुमिकेची खूप चर्चा झाली. दुसरीकडे शिवसेनेला अक्कलकुवा ही एकच जागा मिळाल्याने ती जिंकण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यातून सहाजिकच विद्यमान पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्याशी दुरावा आला. पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. सहाजिकच या दोघांमधील कटूता पुन्हा वाढली. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला बहुमत न मिळाल्याने केवळ सात सदस्य जिंकणाऱ्या शिवसेनेलाच सत्ता स्थापन करण्यासाठी महत्व आले होते. त्यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेस हे दोघे पर्याय खुले ठेवले होते. अखेरच्या दिवशी पक्षाच्या आदेशानुसार काँग्रेस-शिवसेनेची युती झाली. पण अध्यक्ष निवडीतही भाजपने काँग्रेसला पाठींबा देत अध्यक्षपद काँग्रेसला बिनविरोध दिले. उपाध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक लावली. तेथेच खूप काही राजकारण शिजले. पण उपाध्यक्ष निवडीवेळी काँग्रेसचे सदस्य फुटले नाहीत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राम रघुवंशी यांना पाठींबा देत २६ विरुद्ध ३० मतांनी विजयी केले. अर्थात उपाध्यक्ष निवडीत जे झाले नाही ते सभापती निवडीत मात्र झाल्याने राजकारणाची दिशाच बदलली आहे.जि.प.सभापती निवड करतांना निवडीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि शिवसेनेत समझोता झाला होता. मंत्री के.सी.पाडवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, चंद्रकांत रघुवंशी व काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सभापती निवडीचा फार्म्यूला ठरला. पण प्रत्यक्ष निवडीच्या वेळी मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी धोका दिल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणूक ते जिल्हा परिषद निवडणूक पर्यंत रघुवंशी आणि मंत्री पाडवी यांच्यात आलेली कटूता सभापतीच्या निवडीच्या वेळी अधीक वाढली. शिवसेनेने सभापतीपदासाठी के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना पराभूत करणाºया उमेदवारालाच पुढे केल्याने काँग्रेसचे काही सदस्य नाराज झाल्याचे बोलले जात आहे. अर्थात अंतर्गत घडामोडी व नाराजीचे कारणे काहीही असली तरी जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या दिशेने वळण घेत असल्याचे स्पष्ट आहे. आगामी काळात राज्यात शिवसेना-काँग्रेस महाआघाडी असली तरी स्थानिक पातळीवर मात्र या आघाडीत नेहमीच खटके उडणार हे स्पष्ट आहे.