शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात वटवाघळांच्या अचानक मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:57 IST

तळोद्यातील प्रकार : पशुसंवर्धन विभागाकडून दखल, अनेक पिले कुजलेल्या अवस्थेत

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : शहराजवळील मिशन बंगल्याच्या प्रांगणातील झाडाखाली अचानक वटवाघुळांची आठ ते दहा पिल्ली मरून पडल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. ही घटना संबंधित वनविभाला कळविल्यानंतर या विभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर या मृत पक्ष्यांना तेथेच पुरण्यात आले. निपाह रोगाच्या पाश्र्वभूमिवर सुसज्ज तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु लहान मुलांनी गिलोडने या पक्ष्यांना मारल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. तथापि असे वटवाघूळ अचानक झाडाखाली मरून पडले तर तातडीने पशुसंवर्धन अथवा वनविभागास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहराजवळ मिशन बंगला आहे. या बंगल्यातील सुपारीच्या झाडाखाली वटवाघुळाची आठ ते दहा पिल्ले अचानक मरून पडलेली होती. नुकताच निपाह या भयानक रोगाच्या पाश्र्वभूमिवर नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. या बंगल्याकडे जाणा:या एकास वटवाघुळाची ही मेलेली पिल्ले दिसून आली. त्यांनी सरळ वनविभागाकडे संपर्क केला. वनविभागाने तातडीने दखल घेत सहायक उपवनसंरक्षक संजय             अहिरे, हेमंत शेवाळे, वनक्षेत्रापाल नीलेश रोहडे, वनक्षेत्रपाल                    राजेंद्र वायकर, संजय वाणी, सतीष कुवर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे हे घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांनाही ही पिल्ले मृतावस्थेत दिसून आले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. सर्व जागेची पाहणी केली होती. या घटनेबाबत तेथील रहिवाशांना अधिका:यांनी विचारले असता या ठिकाणी सुपारीच्या झाडात वटवाघुळाचे मोठे वास्तव्य आहे. शिवाय त्याचा मोठा कळपदेखील आहे. लहान मुलांनी गिलोडने त्यांना मारल्याचे सांगितले.पंचनाम्यानंतर या वटवाघुळांच्या पिल्लांना जवळच खड्डा करून तेथे पुरण्यात आले. याशिवाय त्यांच्या पडलेल्या विष्ठेवरदेखील चुना टाकण्यात आला होता. निपाह या संसर्ग रोगाच्या पाश्र्वभूमीवर या मृतपिल्लांना पुणे येथील              फॉरेन्सीक प्रयोग शाळेत पाठविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे यांनी वरिष्ठ अधिका:यांशी संपर्क करून बर्फ व खोक्याची   पँकींग यासह सुसज्ज तयारी करून आले होते. मात्र सदर पिले ही कुजलेली आढळून आल्याने त्यांना तेथेच पुरण्यात आले. अन् शेवटी           या दोन्ही यंत्रणांच्या अधिका:यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तरीही खबरदारी म्हणून कुठे वटवाघुळ मेलेल्या स्थितीत आढळून आले तर या विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.