शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींची अशीही परवड

By admin | Updated: June 24, 2017 16:14 IST

मानव विकास मिशन : नवापूर वगळता जिल्ह्यात सर्वत्र मोफत बससेवा नाहीच

संतोष सूर्यवंशी/ऑनलाईन लोकमत 

नंदुरबार, दि.24- विविध शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत़ परंतु तरीदेखील मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थीनींसाठी असलेल्या मोफत बसेस अजून सुरु झाल्या नाहीत़ त्यामुळे पालक तसेच विद्यार्थीनींकडून नाराजीचा सुर व्यक्त होत आह़े दरम्यान जिल्ह्यातील एसटी आगार कार्यालयांशी संपर्क साधला असता, संबंधित गटशिक्षण अधिका:यांकडून याबाबत सूचना मिळाल्या नसल्याने बसेस सुरु करण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात आल़े
महाराष्ट्र राज्य शासनाकडून औरंगाबाद येथील मानव विकास मिशनअंतर्गत 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थीनींना शिक्षण घेणे काहीसे सुखद व्हावे तसेच प्रवासाचा खर्च वाचावा यासाठी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत बससेवा देण्यात येत असत़े याबाबत संबंधित तालुक्यातील गटविकास अधिका:यांकडून मानव विकास मिशन औरंगाबाद येथील कार्यालयाशी संपर्क साधणे अपेक्षीत असत़े त्यांनतर त्यांना किती बसेस आवश्यक आहेत़ कुठल्या मार्गावर त्यांच्या फे:या कराव्यात या बाबत माहिती देण्यात येत असत़े त्यानुसार मानव विकास मिशन कार्यालय संबंधित अगाराला बसेस उपलब्ध करुन देण्याचे आदेश देत असत़े 
परंतु बसेसबाबत संबंधित गटविकास अधिका:यांकडून कुठलेही पाऊले उचलली जात नसल्याने परिणामी विद्याथ्र्याना शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आह़े शाळा, महाविद्यालये सुरु होऊन बरेच दिवस उलटून गेल्यावरही याबाबत कार्यवाही होत नसल्याने चिंता व्यक्त होत आह़े
अक्कलकुवा आगाराच्या आगार प्रमुख अनुजा दुसाने यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार अक्कलकुवा आगाराकडून एकूण 16 बसेस मानव विकास मिशनअंतर्गत मागील वर्षी देण्यात आल्या  होत्या़ त्यात, 7 बसेस अक्कलकुवा, 7 बसेस तळोदा तर दोन बसेस मोलगी व लगतच्या मार्गावर देण्यात आल्या होत्या़ परंतु यंदा याबाबत कुठलीही प्रक्रिया अद्याप सुरु न झाल्याने तसेच योजनेबाबत कुठलाही संपर्क झाला नसल्याने यंदासाठी अजून बसेस सुरु करण्यात आलेल्या नाहीत़ अशी माहिती दुसाने यांनी दिली़ शहादा आगाराकडूनही शहादा व धडगावसाठी 7 मार्गावर 7 बसेस देण्यात येत असल्याची माहिती मिळाली परंतु आगाराकडूनही अजून मानव विकास मिशनअंतर्गत बससेवा सुरु झाली नसल्याचे सांगण्यात आल़े 
 
महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थीनींना शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत बससेवा सुरु करण्यात यावी यासाठी औरंगाबाद येथील कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आह़े
-तेजराव गाडेकर
माध्यमिक शिक्षणाधिकारी
जि़प़ नंदुरबार