शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बॉयलर कोंबडीसाठी एका ग्रा.पं.ची अशीही परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी चक्क धुळे जिल्ह्यातून बॉयलर कोंबडी आणण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत परवानगी देण्यात येत असल्याचेसमोर आले आहे.याबाबत असे की, सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच मुबंई-पुणे सारख्या शहरासह नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्हा प्रशासनामार्फत जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यासाठी आॅनलाइन पास घेणे तसेच तहसील, आर.टी. ओ यांच्याकडून परवानगी घेण्यासाठी साईटदेखील सुरू करण्यात आली आहे. परंतु परजिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तू वाहतुकीसाठी चक्क ग्रामपंचायतमार्फत परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे.प्रशासनामार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध प्रकारे खबरदारी करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आॅनलाइन नोंद होत असल्याने प्रशासनाकडे त्याची माहिती असते तरी ग्रामपंचायत जर इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देत असेल तर कोरोना विषाणू इतर जिल्ह्यात सहज प्रवेश करू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गाभीर्यपणे लक्ष देऊन परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनचालकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.