शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचा असाही रंग प्राण्यांना मिळतोय मानवी ममतेचा संग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:52 IST

भूषण रामराजे । नंदुरबार : परी, गड्डम, भूतू, चिंगी, मांगू, कानू, सोनू आणि आणखी इतर एकाच वेळी जमल्यास १५ ...

भूषण रामराजे ।नंदुरबार : परी, गड्डम, भूतू, चिंगी, मांगू, कानू, सोनू आणि आणखी इतर एकाच वेळी जमल्यास १५ होतात़ दिवसभर येथेच खातात, झोपतात हे सर्व म्हणजे आमचं कुटूंबच आहे असं लक्ष्मीबाई हेमंत मरसाळे ह्या सांगत होत्या़ कोठेही बेवारस मांजर आढळलं की त्याला घरी घेऊन जात संगोपनाची जबाबदारी घेणाऱ्या लक्ष्मीबाई आणि त्यांचे पती हेमंत यांचे मांजरप्रेम संपूर्ण शहरात परिचित आहे़व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाची माहिती घेत भेट घेतली असता, मांजरींचं गोकूळच भासावं असं त्यांच्या घराचं वातावरण होतं़ घराच्या प्रत्येक कोपºयात एक मांजरीचा वावर, फ्रिज, कपाट, पलंग, सोफा अशा सर्वच ठिकाणी मरसाळे कुटूंबाच्या लळ्याने वास्तव्य करणाºया मनीमाऊ मुक्तपणे संचार करुन पहुडल्या होत्या़गांधीनगर भागातील प्लॉट क्रमांक १५३ मध्ये राहणारे हेमंत मरसाळे हे जिल्हा परिषदेत नोकरीस आहेत तर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई ह्या गृहिणी आहेत़ साधारण १५ वर्षांपूर्वी लक्ष्मीबार्इंना घराजवळच्या नाल्यात मांजरीचं पिलू बेवारस अवस्थेत आढळून आलं होतं़ या पिलाला घरी आणून मरसाळे कुटूंबाने त्याला जीवदान दिलं़ त्यांच्यात निर्माण झालेल्या जिव्हाळ्याने आज मांजरींनी भरलेलं घर म्हणून मरसाळे कुटूंबांचा परिचय होतो आहे़ आजअखेरीस मरसाळे यांच्या चौकोनी कुटूंबासह १५ मांजरी त्यांच्या घरात राहतात़ प्रत्येकाची नावे ठरलेली आहे़ नुकतीच त्यांच्या भूतू या मांजरीने तीन पिलांना जन्म दिला आहे़ त्यामुळे ही संख्या आता १८ वर गेली आहे़ मांजर असलं म्हणून काय झालं तोही प्राणी आहे, असा विचार मनात धरुन हे अख्खं कुटूंब त्यांची सेवा करत आहे़सायंकाळी प्रत्येक मांजराला मांसाहारी पदार्थ किंवा दूध देणे सक्तीचे आहे़ सोबत मांजरांसाठी लागणारे खाद्य आणि इतर पदार्थ देऊन त्यांचे संगोपन केले जाते़ यातही एखाद्या पिलाला आजारपण आल्यास लक्ष्मीबाई ह्या जातीनं लक्ष घालून त्याची सुश्रुषा करतात़ बºयाचवेळा पशुवैद्यकांना बोलावून उपचार केले जातात़ थंडीच्या दिवसात बाम लावण्याचेही काम लक्ष्मीबाई काळजीपूर्वक करतात़ सतत मागे फिरणाºया एवढ्या मांजरी पाहून अनेकांना भिती वाटत असल्याने त्यांना बोलावणेही टाळले जाते़ यातून वाईट वाटत असले तरी लहान-लहान मुलांना कोणी घरी एकटं सोडून जातं असा भावनात्मक प्रश्नही त्या उपस्थित करतात़