शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा नवोदय विद्यालयात विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 17:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : जवाहर नवोदय विद्यालयात 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणा:या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली़ पहाटेच्या दरम्यान झालेला हा प्रकार सकाळी वसतीगृह कर्मचा:यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची एकच धावपळ उडाली़ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धडगाव येथून आलेल्या मयत विद्यार्थिनीच्या पालक, नातेवाईक यांच्यासह आदिवासी एकता परिषद, भिलीस्थान टायगर संघटना, आदिवासी शिक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : जवाहर नवोदय विद्यालयात 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणा:या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली़ पहाटेच्या दरम्यान झालेला हा प्रकार सकाळी वसतीगृह कर्मचा:यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची एकच धावपळ उडाली़ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धडगाव येथून आलेल्या मयत विद्यार्थिनीच्या पालक, नातेवाईक यांच्यासह आदिवासी एकता परिषद, भिलीस्थान टायगर संघटना, आदिवासी शिक्षक संघटना यांनी रूग्णालयात ठिय्या आंदोलन करत दोषी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ तोवर शवविच्छेदन होऊ देणार नाही असा, पवित्रा त्यांच्याकडून घेण्यात आला होता़ दुपारी मयत जागृतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक  व वसतीगृहातील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जवाहर नवोदय विद्यालयाच्या 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणारी जागृती नामदेव पावरा, रा़ रोषमाळ बुद्रुक हीची गुरूवारी प्री-बोर्ड परीक्षा असल्याने ती इतर विद्यार्थिनींसोबत बुधवारी रात्री वसतीगृहात अभ्यास करत होती़ पहाटे दोन वाजेच्या सुमारास ती बाहेर गेल्याचे सोबतच्या विद्यार्थिनींना दिसून आल़े बराच वेळ होऊनही ती आली नाही, अभ्यास करत असेल असे वाटल्याने सर्व विद्यार्थिनी झोपून गेल्या़ दरम्यान सकाळी तिचा मृतदेह वसतीगृहाच्या जिन्याखाली गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला़ या प्रकाराची माहिती वसतीगृह प्रशासनाने पोलीसांना कळवल्यानंतर तिच्या पालकांना बोलावण्यात आल़े घटनास्थळी आलेल्या पालकांनी एकच टाहो फोडत आक्रोश केला़ रात्री उशिरा जागृती हिचे अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल़े याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापक श्रीनिवास शर्मा रामय्या ओरूंगती यांनी दिलेल्या खबरीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े दरम्यान, मयत जागृती हिचे वडील नामदेव पावरा यांच्या फिर्यादीवरून प्रभारी मुख्याध्यापक श्रीनिवास सर्मा ओरूंगती, अधिक्षिका हर्षदा नाईक, हाऊस मिस्ट्रेस मनिषा वळवी, रखवालदार कालुसिंग वळवी, जागृतीचे वर्गशिक्षक आणि इतर स्टाफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े त्यांनी जागृती हीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याची शंका उपस्थित केली आह़े दरम्यान जागृती रात्रीच्यावेळी मैत्रिणींकडून कपडे सुकवण्यासाठी दोरी मागत असल्याचे सांगण्यात आले आह़े