शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘साक्षर’ गावासाठी विद्याथ्र्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:49 IST

शुभ वर्तमान : तलावडी येथे तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम

नंदुरबार : निरक्षरपणामुळे येणा:या अडचणींवर मात करण्यात असमर्थ ठरणा:या ग्रामस्थांच्या मदतीला आता विद्यार्थी धावून जात आहेत़ यांतर्गत तलावडी ता़ तळोदा येथे समाजकार्य महाविद्यालयाच्या 8 विद्याथ्र्यानी ‘माहिती व मदत केंद्र’ सुरु केले आह़े केंद्राद्वारे ग्रामस्थांना सवतोपरी मदत करण्यात येत आह़े   तळोदा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावडी येथे लिहिण्या-वाचण्यापुरतं ज्ञान असलेल्या ग्रामस्थांची संख्या अधिक आह़े  यामुळे शासकीय योजना, बँकेचे चलन, मुलांच्या शिक्षणाचे अर्ज भरणे, प्रशासनार्पयत समस्या मांडणे याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत होत़े 700 लोकसंख्या असलेल्या या गावाचा समावेश काजीपूर ग्रुप ग्रामपंचायतीत होत असल्याने गाव तसे वा:यावर होत़े शहरापासून जवळ असल्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती़ गावातील या समस्यांची माहिती तळोदा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात  शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना मिळाली होती़ महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याना वर्षभरात क्षेत्रकार्य विषयांतर्गत गाव दत्तक घेण्याची तरतूद असल्याने त्यांनी महाविद्यालयाने सूचित केलेल्या  गावापेक्षा तलावडी हे गाव दत्तक देण्याची विनंती महाविद्यालय आणि विद्यापीठाकडे केली होती़ यानुसार गेल्या दोन महिन्यापासून हे गाव दत्तक घेतले गेले होत़े गाव दत्तक घेतल्यानंतर कविता चौधरी, शुभांगी खरताडे, रोशना पाडवी, रमेश वळवी, सुरेश पवार, निलेश गिरासे, गिरधर वसावे, विपुल वसावे, सुंदरसिंग वसावे, सुनील वसावे ह्या  विद्यार्थी गटाने गावात भेट देत  शेतकरी, युवक, युवती, किशोरवयीन युवती, महिला, वृद्ध महिला, पुरूष यांचे सव्रेक्षण करत त्यांचे गट तयार करून घेतले होत़े   प्रत्येक गटाची जबाबदारी आठही विद्याथ्र्यानी स्विकारून कामाला सुरूवात केली होती़ यांतर्गत ग्रामस्थांना शासकीय योजना, बँकांचे कजर्, शेतीविषयक माहिती तसेच विविध माहिती देऊन त्यांच्याकडून अजर्ही भरून घेण्यात आले होत़े तब्बल दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाने आता बाळसे धरले असून ग्रामस्थांच्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या आहेत़ यात ब:याच जणांचे दाखल्यांचे अर्ज तयार करणे, दाखले मिळवण्यासाठी कागदपत्रांची माहिती, सुकन्या योजनेत नाव नोंदणी, घरकुलांच्या याद्यांमध्ये नाव नोंदवणे, बँकांमधून पैसे काढणे किंवा पैसे भरण्यासाठी स्लीप कशी भरावी याची माहिती घेणे, पासबुक भरून घेणे, विविध शासकीय योजनांची माहिती करून घेणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आह़े ग्रामस्थांना पॅन कार्ड, उज्ज्वला गॅस योजना यांचा लाभ देण्यासह ई-प्रशासनात होणारी कामे विद्यार्थी निशुल्क करणार आहेत़    केवळ शासकीय योजनांवरच भर न देता महिलांसाठी चारही युवतींकडून मार्गदर्शन वर्ग घेण्यात येत आह़े यात वयात येणा:या युवतींना मासिक पाळी, गर्भवती मातांच्या मासिक तपासणी, महिलांचे विविध आजार यांची माहिती देण्यात येत़े गावात रोजगार नसल्याने बचत गटांच्या माध्यमातून कामे सुरू करण्याचा मानस या विद्याथ्र्याचा असून महाविद्यालयाचा अभ्यास आणि वेळ पाळून ते मदत केंद्रात हजेरी लावत आहेत़ यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून विद्याथ्र्याना सहकार्य करण्यात येत आह़े युवकांच्या या प्रयत्नाने गाव संपूर्ण साक्षर होण्यासाठी हातभार लागत असल्याची माहिती देण्यात आली आह़े