शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर एसटीबसच्या मागणीसाठी विद्याथ्र्याचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्याथ्र्याना परत जाण्यासाठी सायंकाळी वेळेवर बसेस मिळत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्याथ्र्याना परत जाण्यासाठी सायंकाळी वेळेवर बसेस मिळत नसल्याने त्यांनी बुधवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला़ दुस:या सत्रात पहिल्याच दिवशी विद्यार्थी बस आगारात आंदोलन करत असल्याने एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचा:यांची धांदल उडाली होती़ दिवाळीच्या सुटय़ा संपून दुस:या शालेय सत्राला बुधवारी सुरुवात झाली़ यानिमित्ताने विद्यार्थी दुपारी शाळा महाविद्यालयात रवाना झाले होत़े पाच ते सव्वापाच दरम्यान शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बसस्थानकात परत आले होत़े परंतू बराच वेळ थांबूनही गावी जाणा:या बसेस सुटत नसल्याने अनेकांचा धीर सुटला़ त्यांनी थेट बस आगारात जाऊन बसेस सोडण्याची मागणी केली़ यावेळी बसेस उपलब्ध झाल्यानंतर देऊ असे सांगूनही विद्यार्थी व विद्यार्थिनींचे समाधान न झाल्याने त्यांनी बस आगारातच घोषणाबाजी सुरु करत आंदोलनाचा पवित्रा घेतला़ यावेळी आगारातील अधिका:यांनी त्यांना समजावूनही विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत़े नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागासह खोंडामळी, कोपर्ली, दहिंदुले, भालेर, शिंदगव्हाण, काकर्दे, हाटमोहिदे या परिसरातील गावांकडे जाणा:या बसेस नसल्याने विद्याथ्र्याचे हाल सुरु होत़े यावेळी विद्याथ्र्यानी पूर्व भागातील काही राजकीय पदाधिका:यांना माहिती देत बोलावून घेतले होत़े त्यांनी येऊन मध्यस्थी केल्यानंतर बसेस देऊन नियोजन करण्यात आल़े सायंकाळी साडेसात वाजेर्पयत बसेस उपलब्ध नसल्याने विद्यार्थी बसस्थानक परिसरात फिरत असल्याचे दिसून आल़े नंदुरबार बसस्थानकात यापूर्वीही पासधारक विद्याथ्र्याना बसेस मिळत नसल्याचे प्रकार घडले आहेत़ याकडे संबधित एसटी महामंडळाकडून गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्याने पासधारक विद्यार्थी वेळावेळी आक्रमक भूमिका घेत आहेत़ यातून येत्या काळात गंभीर प्रकार घडण्याची भिती आह़े दरम्या सुरु असलेल्या या प्रकारामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला़ आगारातून बसेस निघत नसल्याने काही बसेस उशिराने धावल्या़ 

नंदुरबार बसस्थानकातून ग्रामीण भागात सायंकाळी सोडण्यात येणा:या बसेसचे नियोजन चुकत असल्याचे ब:याचवेळा दिसून आले आह़े शाळांच्या वेळेनुसार त्या-त्या मार्गावरील विद्याथ्र्यासाठी बसेस सोडण्याची गरज असतानाही कारवाई करण्यात येत नसल्याने विद्याथ्र्यानी आंदोलन केल़े ब:याचवेळा बसेस उपलब्ध नसल्याने विद्याथ्र्याना सायंकाळर्पयत बसस्थानकात बसून रहावे लागत आह़े