शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीनीवर अत्याचार करणा:या शिक्षकाला 10 वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : इयत्ता पाचवीत        शिकणा:या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा:या शिक्षकाला दोन विविध कलमांतर्गत प्रत्येकी 10 वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी ठोठावली.यासंदर्भात हकीगत अशी की, केरळ येथील राजेश राजन नायर हा खापर येथील खाजगी शाळेत शिक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : इयत्ता पाचवीत        शिकणा:या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा:या शिक्षकाला दोन विविध कलमांतर्गत प्रत्येकी 10 वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी ठोठावली.यासंदर्भात हकीगत अशी की, केरळ येथील राजेश राजन नायर हा खापर येथील खाजगी शाळेत शिक्षक असून मुलांची इंग्रजी विषयाची शिकवणी घेतो. नायर रहात असलेल्या इमारतीतीलच एक पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी त्याच्याकडे शिकवणीसाठी येत होती. 12           सप्टेंबर 2016 रोजी नेहमीप्रमाणे शिकवणी झाल्यावर नायर याने             इतर विद्याथ्र्याना सुटी देऊन पीडित मुलीस थांबवून घेतले व नंतर            रुमचे दार लावून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. सायंकाळी              मुलगी लवकर घरी न परतल्याने मुलीच्या शोधात निघालेल्या मुलीच्या आईला मुलगी शिक्षकाच्या घरातून रडत बाहेर पडताना दिसली. आईने मुलीस काय झाले असे विचारता मुलीने आईकडे आपबिती कथन केली.यासंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन शहादा येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. या खटल्यात पीडित 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी एम.वाय. तुंगर, महिला पोलीस दर्शना गावीत, ए.पी.आय. जी.एम. न्हायदे, तपासी अधिकारी आर.डी. भावसार आदींची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीवरील गुन्हा सिद्ध             झाल्याने न्या.के.एल. व्यास यांनी आरोपीस लैंगिक अत्याचाराच्या आरोपात 10 वर्षे कारावास व               तीन हजार रुपये दंडाची शिक्षा            तसेच लैंगिक बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये 10 वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीस दोन्ही शिक्षा एकाचवेळेस भोगावयाच्या असून दंडाच्या रकमेतून 4500 रुपये पीडितेस देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. सरकार पक्षातर्फे जसराज संचेती यांनी              काम पाहिले. तसेच नासीर पठाण यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.