शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील शालेय, पदवी व पदव्युत्तर विद्याथ्र्याना मिळणा:या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक समस्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील शालेय, पदवी व पदव्युत्तर विद्याथ्र्याना मिळणा:या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. शहरी व ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी सुरळीत नसल्याने ऑनलाईन अर्ज करताना अडचणी निर्माण होत आहेत.शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्याथ्र्याना सुलभ व पारदर्शकपणे मिळावा  व शिष्यवृत्तीमधील दोष टाळून या प्रकियेत कसलाही गैरप्रकार किंवा दिरंगाई होऊ नये यासाठी शासनातर्फे शिष्यवृत्ती योजना ही ऑनलाईन करण्यात आली.          2017-18 या शैक्षणिक सत्रापासून सुरू झालेल्या या पद्धतीबद्दल विद्याथ्र्यासह महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. मात्र शहरी भागासह ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीत अडचणी येत आहे. तसेच मुदत संपत असल्याने विद्यार्थी हा अनभिज्ञ व उदासीन दिसून येत आहे. याअगोदर शिष्यवृत्ती अर्ज कागदपत्राच्या आधारे समाजकल्याण विभागामार्फत संबंधित शाळा-महाविद्यालय यांच्याकडून संबंधित विद्याथ्र्याना  धनादेशाद्वारे देण्यात येत होती. यात अनेकवेळा अनियमितता होत असल्याचा ठपका ठेवत शासनाने संपूर्ण प्रकिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपण्याच्या मार्गावर असताना बहुतांश विद्याथ्र्यानी तांत्रिक कारणामुळे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले नाही. या योजनेसाठी विद्याथ्र्याना आधारकार्डसह विविध कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतात. मात्र अशी सुविधा करताना इंटरनेट कनेक्टीव्हीटी बंद होण्यासह इतर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्याथ्र्यानी गैरसोय होऊन पालक व विद्याथ्र्याची दमछाक होत आहे. संबंधित विभागाने ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करताना येणा:या तांत्रिक अडचणीत सुधारणा करून मुदत वाढविण्याची मागणी होत आहे.ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरताना  शासन प्रत्येकवेळी नवीन नियम काढत असल्याने विद्यार्थी संभ्रमात असतात. अनेकवेळा संबंधित विभागाची वेबसाईट नियमित बंद असते. त्यामुळे विद्याथ्र्याचा खूप वेळ  वाया जातो. शिष्यवृत्ती हा विद्याथ्र्याचा हक्क असूनही त्यापासून तो नियमित वंचित ठेवण्यात शासन यशस्वी झाले. अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेच्या माध्यमातून विद्याथ्र्याचे मुबलक पैसे खर्च होतात. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने एकाच पद्धतीचा वापर करावा. -प्रीतम निकम, कार्यकारिणी सदस्य, अ.भा. विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश