शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘डेंग्यू’बाबत आता विद्याथ्र्याचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:27 IST

विद्याथ्र्यामार्फत होणार प्रबोधन : विविध शाळा महाविद्यालयांचा असणार सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार नगरपालिकेकडून यंदा डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुणीया आदींबाबत नगरपालिकेच्या कर्मचा:यांसोबतच विद्याथ्र्यामार्फतही नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आह़े पुढील आठवडय़ापासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आह़े या अभियानात शहरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयांतील विद्याथ्र्याना सहभागी करण्यात येणार आह़े सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुणगुनीया तसेच इतर संधीसाधून आजारांचा धोका निर्माण होत असतो़ नंदुरबारात अद्यापर्पयत डेंग्यूचे रुग्ण आढळले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून या आधिच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितल़े या दिवसांमध्ये डेंग्यू किंवा सदृश आजार आपले डोके वर काढत असतात़ त्यासाठी नगरपालिकेकडून अनेक वेळा आजूबाजूला स्वच्छता ठेवा, पाणी साचनार नाही यासाठी रिकामी भांडी पालथी करुन ठेवा आदींबाबत प्रबोधन करण्यात येत असत़े परंतु या मोहिमेला नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा:यांकडून सांगण्यात येत असत़े परंतु यंदा पालिकेकडून यावर नवीन प्रयोग म्हणून शहरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयातील विद्याथ्र्यामार्फत नंदुरबारकरांचे प्रबोधन करण्यात  येणार आह़े यासाठी स्वता मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी पुढाकार घेतला आह़ेयाबाबत नगरपालिकेकडून संबंधित  शाळा, महाविद्यालयातील व्यवस्थापनाशी बोलून विद्याथ्र्याना पालिकेच्या या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार आह़े विद्याथ्र्याकडून पथनाटय़, पोस्टर, तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांना डेंग्यू, मलेरियापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आह़े संबंधित विद्याथ्र्याकडून नगरपालिका हद्दीतील परिसरात जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आल़े यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचा:यांचे वेळावेळी विद्याथ्र्याना मार्गदर्शन उपलब्ध होणार आह़े डेंग्यू बाबत जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े अद्यापर्पयत डेंग्यू किंवा सदृश आजाराचा रुग्ण आढळला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़ भोये यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़े त्यामुळे सध्या तरी डेंग्यूची चिता नसली तरी याबाबत आधिच काळजी घेतलेली बरी या उद्देशाने पालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आह़ेदरम्यान, पालिकेकडून सध्या शहरातील विविध ठिकाणी जंतू नाशक फवारणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितल़े तसेच शहरातील नागरिकांना रिकामी भांडी पालथी ठेवा, सभोवतालचा परिसर स्वच्छ  ठेवा आदींबाबत सांगण्यात आले आह़े शहरातील बहुसंख्य भागात घराच्या छतावर नागरिकांनी निरुपयोगी भांडी आढळून आले आहेत़ पावसाच्या पाण्यामुळे यात डासअळ्या निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ यामुळे सर्वाधिक डेंग्यू, मलेरिया आदींचा प्रभाव वाढत असल्याचेही  तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असत़े त्यामुळे नागरिकांनी पालिकेकडून देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करावे असेही सांगण्यात येत आह़े